Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Page 2 ||| Agrowon

चक्रिवादळाचा थंडीवर परिणाम

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या भागात हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होत आहे. 

कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या भागात हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होत आहे. 

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब सुरुवातीस दोन दिवस राहील. मात्र त्याच वेळी बंगालच्या उपसागरावरील चेन्नईपासून ४५० कि.मी.वर हवेचे दाब पुन्हा कमी होत असून, निवार चक्रिवादळानंतर पुन्हा दुसरे चक्रिवादळ निर्माण होत असून, पुन्हा ते चेन्नईच्या दिशेने येत आहे. बंगालच्या उपसागरात ही वादळे १० अक्षांशावर व ८३ रेखांशावर तयार होत असून, दक्षिण व आग्नेयेकडून येणारे उष्ण वारे महाराष्ट्राच्या भागातही येत आहेत. त्या वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात बाष्पही येत आहे.
   हिवाळी हंगामात थंडीचे प्रमाण वाढण्याऐवजी ते कमी होत आहे. हीच स्थिती ५ डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच कोकणात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातही कमाल व किमान तापमानात घट होणार नाही. 
   हवामानबदलाच्या प्रभावाने थंडीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत असून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा-पुन्हा बंगालच्या उपसागरात तयार होणारी चक्रिवादळे हवामानबदलास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच ईशान्य वाऱ्यांचा, तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असून, हवेच्या दाबावरही त्याचे सातत्याने परिणाम होत आहेत. हवामान ढगाळ राहण्याचे प्रमाण कायम राहत आहे. चांगल्या थंडीचा प्रभावाचा कालावधी कमी होत आहे. याचा परिणाम या वर्षीच्या उसाच्या रिकव्हरीवर होईल. मात्र या हवामानाचा फायदा ज्वारी पिकास होईल. 

कोकण
 सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात ते २४ अंश सेल्सिअस राहील. कोकणात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ व ३० नोव्हेंबर रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता असून, रायगड व ठाणे जिल्ह्यात ४ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सध्याचे तापमान भात काढणीस उत्तम असून, रब्बी पिकांनाही पोषक आहे. 

उत्तर महाराष्ट्र 
 उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस व किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ७४ टक्के, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ५३ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता नाही. सध्याचे हवामान कापूस व ज्वारी पिकास पोषक राहील. 

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात हवामान थंड राहणे शक्‍य असून, कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकास ते पोषक राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत ७१ ते ७७ टक्के राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ६८ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ५४ टक्के इतकी कमी राहील, तसेच दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४७ ते ४८ टक्के राहील. नांदेड व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५६ टक्के राहील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता व दुपारची सापेक्ष आर्द्रता व तापमान कापूस वेचणीस अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. 

पश्‍चिम विदर्भ
 बुलडाणा, वाशिम, अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. वाशिम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६० टक्के, तर दुपारची ३७ ते ४० टक्के इतकी कमी राहील. कापूस वेचणीस तापमान व आर्द्रता अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

मध्य विदर्भ
 यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येवरून राहील. पावसाची शक्‍यता कमी असल्याने कापूस वेचणीस हवामान अनुकूल राहील. 

पूर्व विदर्भ
 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ ते ३६ टक्के व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ४० ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील, तर वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्र
सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. उसाच्या उताऱ्यावर ते परिणाम करेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ८१ ते ९० टक्के राहील, तर नगर जिल्ह्यात ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. 

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)


इतर ताज्या घडामोडी
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...