कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांतमहासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे.  भारतावरील हवेचा दाब कमी राहण्यामुळे भारताच्या दिशेने लोटल्या जाणाऱ्या बाष्पाचे ढग भारतातील बऱ्याच भागात जमून पावसाची शक्‍यता आहे. त्यातूनच जेथे हवेचा दाब कमी आहे, तेथे विजांच्या कडकडाटासह ऐन हिवाळ्यात पाऊस होईल. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. थंडीची तीव्रता कमी राहणार आहे. वाऱ्याची दिशा अद्यापही अग्नेयेकडून राहण्यामुळे अशी स्थिती निर्माण होत आहे.  कोकण  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत आज २७ ते ३८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील.  उत्तर महाराष्ट्र  धुळे व नाशिक जिल्ह्यात आज २० मि.मी. व उद्या ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६९ टक्के दुपारची ३३ ते ४६ टक्के राहील. आकाश अंशतः सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील.  मराठवाडा  मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहिल्यामुळे थंडीचे प्राबल्य कमी राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, बीड व परभणी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २७ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के इतकी कमी राहील.  पश्‍चिम विदर्भ  पश्‍चिम विदर्भात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता नाही. मात्र हवामान अंशतः ढगाळ राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के राहील, तर दुपारची २८ ते ३४ टक्के राहील.  मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील.  पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.  दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्र  नगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २७ ते ३८ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच सातारा व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, नगर, सोलापूर जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८१ टक्के, तर दुपारची ३९ ते ५९ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • उन्हाळी भुईमूग, भेंडी, उन्हाळी बाजरी, मूग, तीळ, वेलवर्गीय भाजीपाला लागवडीस 
  • हवामान अनुकूल आहे. 
  • हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रणासाठी शेतात पक्षिथांबे उभारावेत. 
  • कपाशीची वेचणी वारा शांत असताना सकाळी करावी. 
  • गव्हाच्या पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. 
  •  फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम फॉर साउथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com