Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Page 2 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 10 जानेवारी 2021

ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे. 

ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे. 
भारतावरील हवेचा दाब कमी राहण्यामुळे भारताच्या दिशेने लोटल्या जाणाऱ्या बाष्पाचे ढग भारतातील बऱ्याच भागात जमून पावसाची शक्‍यता आहे. त्यातूनच जेथे हवेचा दाब कमी आहे, तेथे विजांच्या कडकडाटासह ऐन हिवाळ्यात पाऊस होईल. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. थंडीची तीव्रता कमी राहणार आहे. वाऱ्याची दिशा अद्यापही अग्नेयेकडून राहण्यामुळे अशी स्थिती निर्माण होत आहे. 

कोकण 
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत आज २७ ते ३८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील. 

उत्तर महाराष्ट्र 
धुळे व नाशिक जिल्ह्यात आज २० मि.मी. व उद्या ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६९ टक्के दुपारची ३३ ते ४६ टक्के राहील. आकाश अंशतः सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील.

 मराठवाडा 
मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहिल्यामुळे थंडीचे प्राबल्य कमी राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, बीड व परभणी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २७ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के इतकी कमी राहील. 

पश्‍चिम विदर्भ 
पश्‍चिम विदर्भात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता नाही. मात्र हवामान अंशतः ढगाळ राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के राहील, तर दुपारची २८ ते ३४ टक्के राहील.

 मध्य विदर्भ 
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील. 

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. 

दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्र 
नगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २७ ते ३८ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच सातारा व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, नगर, सोलापूर जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८१ टक्के, तर दुपारची ३९ ते ५९ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • उन्हाळी भुईमूग, भेंडी, उन्हाळी बाजरी, मूग, तीळ, वेलवर्गीय भाजीपाला लागवडीस 
  • हवामान अनुकूल आहे. 
  • हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रणासाठी शेतात पक्षिथांबे उभारावेत. 
  • कपाशीची वेचणी वारा शांत असताना सकाळी करावी. 
  • गव्हाच्या पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. 
  •  फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी 
फोरम फॉर साउथ आशिया)


इतर ताज्या घडामोडी
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...
कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत...