Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Agrowon

ढगाळ हवामान, पावसाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 16 मे 2021

महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होत असून, राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीय वादळ पश्‍चिम किनारपट्टीजवळून उत्तर दिशेने सरकत आहे.

महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होत असून, राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीय वादळ पश्‍चिम किनारपट्टीजवळून उत्तर दिशेने सरकत आहे. सध्या ते महाराष्ट्र - कर्नाटक सीमेजवळ असून, उद्या ते गोवा व दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ असेल. मंगळवार (ता. १८) रोजी चक्रीय वादळ मुंबईपासून दूरवर समुद्रातून गुजरातच्या कच्छ किनारपट्टीजवळ पोहोचेल. बुधवार व गुरुवार रोजी ते कच्छ किनारपट्टीजवळ घोंघावत राहील. 

सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार वारे व पावसाची शक्‍यता निर्माण होईल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० ते ५० मिलिमीटर पावसाची शक्‍यता सोमवारी असून, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात १०० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतही ३५ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. याशिवाय पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यांत १६ ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते २८ कि.मी. राहील. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंश अथवा त्याहून अधिक राहील. किमान तापमानातही वाढ होईल. 

कोकण
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत रविवारी १० ते १८ मि.मी., तर सोमवारी ४० ते ४८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यांत रविवारी ७ ते ९ मि.मी., तर सोमवारी ८ ते २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ती ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात वाढ होऊन ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील. 

उत्तर महाराष्ट्र
 नंदूरबार व नाशिक जिल्ह्यात ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमानातही वाढ होऊन ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के इतकी कमी राहील.

मराठवाडा
 उस्मानाबाद जिल्ह्यात २१ मि.मी., लातूर जिल्ह्यात ८ मि.मी., बीड जिल्ह्यात ५ मि.मी. रविवारी व सोमवारी पावसाची शक्‍यता आहे. सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २५ कि.मी. राहील, तसेच जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात तो ताशी ७ ते १४ कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ५५ टक्के, तर  दुपारची १६ ते २८ टक्के राहील. 

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील, तसेच अमरावती जिल्ह्यात ते ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४१ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १५ कि.मी. राहील व दिशा आग्नेयेकडून राहील. 

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४१ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम जिल्ह्यात १५ कि.मी. राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ८ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता कमी राहील. 

पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ६५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २४ टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ कि.मी. राहील, तर गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात ते ८ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. 

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी १०० मि.मी.पर्यंत पावसाची शक्‍यता असून, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३६ ते ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात २४ मि.मी. व नगर जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रविवारीही या सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस, तर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५५ टक्के, तर दुपारची २१ ते २६ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांत बागेतील आंब्याच्या देठाजवळ खड्डा तयार झाला असेल. पाड लागलेला असेल तर आंबा फळांची काढणी करावी. 
  • अंजिराची फळे व फुलशेतीतील फुले पक्व झाली असल्यास काढणी करून माल विक्रीस पाठवावा. 
  • नवीन लागवड करावयाच्या फळबागांसाठी खड्डे तयार करावेत. 
  • फळझाडावर अधिक फळे असल्यास लहान झाडांना आधार द्यावा. फळबागांच्यामध्ये ठिबक सिंचन, आच्छादन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी 
फोरम फॉर साउथ आशिया.)


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...