Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Page 2 ||| Agrowon

हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 25 जुलै 2021

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब सुरुवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब सुरुवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
 

बुधवारी हवेचे दाब कमी होण्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल, तसेच त्यानंतर पुन्हा हवेच्या दाबात वाढ होताच पावसाचे प्रमाण कमी होणे शक्‍य आहे. शनिवारी हवेचे दाब कमी होतील व ते तसेच राहतील. त्यामुळे कोकणात मुसळधार तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही चांगल्या पावसाचा अंदाज रविवारी व सोमवारी आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर मात्र कमी राहील. हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा संपूर्ण महाराष्ट्रात नैर्ऋत्येकडून राहील. मात्र मॉन्सून पावसाला जोर राहणार नाही. महाराष्ट्रातील काही भागात म्हणजेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागांत वाढणे शक्‍य होईल. 

कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी ५५ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ७० ते ७४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात ८१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर सोमवार रायगड व ठाणे जिल्ह्यांत ७० मि.मी., तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३२ ते ५० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८३ टक्के राहील. 

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात रविवारी व सोमवारी दमदार पावसाची शक्‍यता असून, पावसाचे प्रमाण पश्‍चिम भागात ४३ ते ४७ मि.मी. राहील, तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत हेच प्रमाण रविवारी व सोमवारी ४ ते १७ मि.मी. इतके कमी राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 
७८ ते ८८ टक्के, तर दुपारची ५४ ते ७६ टक्के राहील. 

मराठवाडा
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत या आठवड्यांत रविवारी व सोमवारी पावसाचे प्रमाण कमी असेल. उस्मानाबाद जिल्ह्यात ६ मि.मी., लातूर, परभणी, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांत ४ ते ६ मि.मी., तर नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता असल्याने बराच काळ पावसात उघडीप आणि अल्प काळ पाऊस अशी स्थिती राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होईल. आंतरमशागतीच्या कामांना वेग येईल. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश 
सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५६ टक्के इतकी कमी राहील. 

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी ६ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता असून, अकोला जिल्ह्यात ३ ते १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८४ टक्के, तर दुपारची ५४ ते ५७ टक्के राहील. 

मध्य विदर्भ
यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ५ ते १६ मि.मी. पावसाची शक्‍यता रविवारी व सोमवारी असून, नागपूर जिल्ह्यात सोमवारी २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.  कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५५ टक्के राहील. 

पूर्व विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी ८ मि.मी. व २४ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, गडचिरोली जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १२ मि.मी. व ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत रविवारी ६ मि.मी., तर सोमवारी १२ ते ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची ५६ ते ६२ टक्के राहील. 

पश्‍चिम महाराष्ट्र
रविवारी व सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात ४२ ते ५५ मि.मी., सांगली जिल्ह्यात १६ ते २० मि.मी., सातारा जिल्ह्यात ११ ते १६ मि.मी., पुणे जिल्ह्यात २० ते २२ मि.मी., तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ६ ते ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३० अंश, सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअश आणि सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ८२ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  •  जेथे पावसात उघडीप असेल तेथे तेथे कोळपणी करावी. 
  •   बाजरी, ज्वारी व मका पीक एक महिन्याचे होताच नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. 
  •  भाजीपाला पिकांवरील रस शोषणाऱ्या किडींचे वेळीच नियंत्रण करावे. 
  •  हळद व आले पिकास मातीची भर द्यावी. 
  •  कलमांना काठीचा आधार द्यावा.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी 
फोरम फॉर साउथ आशिया)


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...