Agriculture Agricultural News Marathi article regarding world meteorology organization | Page 2 ||| Agrowon

हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान संघटना

डॉ. प्रल्हाद जायभाये
मंगळवार, 31 मार्च 2020

पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच पावसाच्या वेळापत्रकातील आकस्मिक होणारे बदल यांचा समावेश होतो. कधी गारपीट तर कधी तीव्र उन्हाळा किंवा हिवाळा आणि जोडीला दुष्काळ असे हवामानाचे सातत्याने बदलणारे रूप आपण पाहत आहोत. यासाठी वातावरणीय बदल आणि त्या‍चा जलचक्रावरील परिणाम अभ्यासण्यासाठी जागतिक हवामान संघटना सातत्याने कार्यरत असते.

पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच पावसाच्या वेळापत्रकातील आकस्मिक होणारे बदल यांचा समावेश होतो. कधी गारपीट तर कधी तीव्र उन्हाळा किंवा हिवाळा आणि जोडीला दुष्काळ असे हवामानाचे सातत्याने बदलणारे रूप आपण पाहत आहोत. यासाठी वातावरणीय बदल आणि त्या‍चा जलचक्रावरील परिणाम अभ्यासण्यासाठी जागतिक हवामान संघटना सातत्याने कार्यरत असते. या संघटनेची माहिती व कार्य जाणून घेऊयात.

पृथ्वीवरील जैविक अन्नसाखळी प्रामुख्याने निसर्गतः: उपलब्ध होणाऱ्या पाणी आणि त्याचा ऱ्हास यावर अवलंबून आहे. थोडक्यात, पाण्याचे प्रमाण आणि त्याची प्रत यावरच पृथ्वीवरील बहुतांश सजीवांचे जगणे ठरते. माणसांच्या अन्नाच्या उपलब्धता ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून होणारे उत्पादन हे प्रामुख्याने सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असते.  वैश्विक पातळीवर मनुष्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या एकूण पाणी वापरांपैकी शेतीसाठीचा वापर सुमारे दोन तृतीआंश इतका मोठा आहे. कोरडवाहू वातावरणातील बहुतांश देश प्रामुख्याने उपलब्ध असणाऱ्या शुध्द पाण्यापैकी ८० टक्के वापर हा शेती सिंचनाकरिता करतात.  यामुळे पाण्याचे गणित, त्याचे शास्त्र , उपलब्धी प्रमाण आणि ऱ्हास याचा अभ्यास सातत्याने करणे आवश्यक आहे. यासाठी वातावरणीय बदल आणि त्या‍चा जलचक्रावरील परिणाम अभ्यासण्यासाठी जागतिक हवामान संघटना सातत्याने कार्यरत असते.

२०१२ मध्ये भारतात एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये `हवामान बदलाच्या काळात हवामान अंदाजातील संधी व आव्हाने` या विषयावर बोलताना जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस डॉ. मायकल जेराड यांनी हवामान अंदाजाची उपयुक्तता वाढविण्याकरिता जगभरातील जास्तीत जास्त हवामान नोंदी मिळविण्याचा कार्यक्रम ‘जागतिक हवामान संघटनेने (वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन) सुरू केल्याचे सांगितले होते. जमा केलेल्या हवामानाच्या माहितीची नोंद व देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेद्वारे SYNOP, CLIMATE आणि TEMP सांख्यिकीय चिन्ह (न्युमॅरिक कोड) वापरले जाते. यात जमिनीवरील हवामान, सागरी आणि जलपृष्ठीय प्रकारच्या नोंदी केल्या जातात.

शस्त्र म्हणून वापर नको
हवामानशास्त्राच्या उपयुक्ततेप्रमाणेच शस्त्र म्हणूनही वापर होऊ शकतो. एकविसाव्या शतकातील देशादेशातील किंवा राज्याराज्यातील कलह विशेषतः नदी व पाण्याच्या वाटपावरून उद्भवत जाणार आहेत. उदा. पाकिस्तान- भारत, चीन-भारत ही देशादेशांमधील पाणी वाटपाचे कलह, तर महाराष्ट्र -कर्नाटक, महाराष्ट्र -आंध्र प्रदेश यांच्यातील वाद. अशा प्रसंगी शस्त्रांप्रमाणे या शास्त्राचा वापर होणार नाही, याकडे जागतिक पातळीवर लक्ष दिले गेले पाहिजे. हवामानशास्त्राचा विघातक स्वरूपात वापर होऊ न देण्याची व त्याचा वापर फक्त‍ आणि फक्त मानवाच्या  एकूण सजीवांच्या शाश्वततेसाठी, भुकमूक्तीसाठी, संवर्धनासाठी केला गेला पाहिजे. वातावरणाचा समतोल राखून, सर्वांसाठी ताजे व शुध्दे पाणी उपलब्ध करण्याचा संकल्पही केला पाहिजे.

जागतिक हवामान संघटनेची रचना 

  • एक सरचिटणीस, चार इतर पदाधिकारी सभागृहाव्दारे निवडले जातात. ते जास्तीत जास्त बारा वर्षे राहू शकतात. डॉ. जेराड हे सरचिटणीस म्हणून १ जानेवारी २००४ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर सन २०१९ पासून सध्याचे सरचिटणीस ग्रेहार्ड अॅड्रीन (जर्मनी) हे आहेत. त्यानंतर एक उपसरचिटणीस, सहसरचिटणीस आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य अशी रचना असते.
  • जागतिक हवामान संघटनेच्या अध्य‍क्षस्थानी असणारे विधिमंडळ अथवा गृह यांच्या मार्फत या सर्वांची निवड केली जाते.
  •  संघटनेचे १८७ देश आणि ६ संयुक्त व वसाहती राष्ट्रे असे मिळून १९३ देश सदस्य आहेत. या सदस्य देशाचे हवामान विभागप्रमुख संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य राहतात. या संघटनेचे सभासदत्व खुले किंवा ऐच्छिक आहे. 
  •  भारतीय हवामान विभागाचे महासंचालक हे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य आहेत. परंतु भारताला आजपर्यंत जागतिक हवामान संघटनेत एकदाही महत्त्वाचे पद मिळालेले नाही.

इतिहास
सन १८७३ मध्ये  व्हिएन्ना  येथे आंतरराष्ट्रीय हवामान संस्था   (आयएमओ)’ ही सरकारी; परंतु स्वायत्त अशा संस्थेची स्थापना करण्यात आली. संयुक्त  राष्ट्र संघाची एक शाखा २३ मार्च १९५० ला आयएमओ उदयास आली. सन १९५१ पासून आयएमओ ही निमसरकारी संस्था म्हणून संयुक्त राष्‍ट्र संघाची एक चांगली शाखा म्हणून काम पाहू लागली.  सन १९५१ मध्ये  आयएमओ च्या नावात बदल होऊन ‘जागतिक हवामान संघटना’ असे झाले. म्हणून याच वर्षापासून २३ मार्च हा ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो.  

धोरण 
हवामान किंवा वातावरण हे कुठल्याही राष्ट्राच्या, राजकीय पक्षाच्या किंवा विचारधारेच्या, आर्थिक किंवा वंशिक अथवा धार्मिक सीमा पाळत नाही. हे तत्त्व लक्षात घेऊन त्याला सुसंगत असे धोरण गेल्या सत्तर वर्षात या संस्थेद्वारे राबवले जाते. मानवाच्या प्रगतीसाठी सदस्य देशांतील हवामान आणि जलशास्त्र संस्थेस मार्गदर्शन, संशोधन आणि तांत्रिक मदत केली जाते. यामुळे कोफी अन्नान यांनी या संस्थेला ‘सुसूत्रीकरण करणारी संघटना’ असेही म्हटले होते.  

संस्थेचे कार्य 

    जागतिक हवामान संघटनेला पृथ्वीवरील वातावरण, जमीन, सागर, हवामान, जैवविविधता, पर्यावरण आणि जलस्त्रोत या बाबतीतील विश्लेषण व मार्गदर्शन करणारी पदसिध्द संस्था मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाची हवामान विषयातील अधिकृत प्रवक्ता म्हणूनही ती ओळखली जाते.

  • संस्थेने वैज्ञानिक आणि तांत्रिक कार्यक्रमांतर्गत जागतिक हवामान निरीक्षक उपग्रह, जागतिक वातावरण प्रकल्प, वैश्विक वातावरण प्रकल्प, जागतिक हवामान संशोधन प्रकल्प, अवकाश प्रकल्प असे महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प राबवले आहेत. यातील काही प्रकल्प हे स्वतंत्रपणे, तर काही आयपीसीसी, जागतिक वातावरण संशोधन प्रकल्प, वैश्विक वातावरण निरीक्षण यंत्रणा, वैश्विक सागरीय निरीक्षण यंत्रणा आणि वैश्विक भूमी निरीक्षण यंत्रणा अशा संस्थांसह भागीदारीमध्ये सुरू आहेत.
  • हवामानविषयक माहितीची सदस्य देशांतर्गत देवाण-घेवाण केली जाते. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळ, अतिवृष्टीत, त्सुनामी किंवा दुष्काळ, तसेच भूकंप, ज्वालामुखी यांची माहिती दिली जाते. अशा सुमारे ९० टक्के नैसर्गिक आपत्तीची  झळ बसू नये, यासाठी संस्थेने बहुमोल कार्य केले आहे.
  •  जागतिक वातावरण प्रकल्पांतर्गत कृषी हवामान हा विकास कार्यक्रम आहे. भारतीय हवामान विभागातही कृषी हवामानशास्त्र विभाग कार्यरत आहे. त्याच प्रमाणे अनेक कृषी विदयापीठांमध्येही कृषी हवामानशास्त्र विभाग कार्यान्वित आहे. यातून हवामानाच्या अचूक नोंदी उपलब्ध होण्यासोबतच कृषी क्षेत्रावरील हवामानाच्या परिणामांचे अंदाज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. यातून शेती आणि ग्रामीण भागातील उत्पादनांचे, उत्प‍न्नाचे आणि एकूणच जीवनशैलीवरील वातावरणीय धोके कमी करणे शक्य होईल.  
  • कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र येत एकात्मिक अभ्यास करण्याची आवश्यकता वाढत आहे. वादळ, वारा आणि पाऊस या आपत्तीसंबंधी सूचना देणारे डॉप्लर वादाच्या भोवऱ्यातून बाहेर काढून उभारणी करण्यात भारतीय हवामान विभागाला यश आले आहे. अशी अनेक केंद्रे उभारण्यात आली असून, त्याद्वारे हवामान विषयक अंदाज अचूकतेने देणे शक्य होत आहे.  
  • पिकांच्या उत्पादनामध्ये हवामान अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते, त्यामुळे त्याच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक कृषी विदयापीठामध्ये कृषिहवामानशास्त्र  विषयाच्या अध्यापन व संशोधनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. किमान महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये चार विभागासाठी स्वतंत्र संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू व्हायला हवे.

- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९
(डॉ. जायभाये हे कृषी हवामानशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. डॉ. धर्मराज गोखले हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी येथे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) म्हणून कार्यरत आहेत)  

 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
शेतकरी नियोजन पीक - ज्वारीज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...