दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
टेक्नोवन
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो.
फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो.
फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.
फळांची शीतगृहातील साठवण
काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते. शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते.
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष
नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या उद्यानविद्या विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुशांतकुमार रॉय यांनी बाष्पीभवनाने थंडपणा या नैसर्गिक तत्त्वावर आधारित शीतकक्ष विकसित केला आहे. या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही. शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते.
शीतकक्ष उभारणीसाठी आवश्यक वस्तू
विटा, नदी पात्रातील बारीक वाळू, बांबू, वाळलेले गवत, सुतळी आदी वस्तूची आवश्यकता असते.
शीतकक्षाचा आराखडा आणि उभारणी
- शीतकक्षाच्या तळाशी विटांचा एक थर द्यावा. कक्षाच्या भिंती विटांचे थर देऊन रचाव्यात. दोन भिंतीमध्ये ३ इंच एवढी मोकळी जागा सोडावी. मोकळ्या जागी नदीपात्रातील बारीक वाळू भरावी.
- कक्षावर झाकण्यासाठी बांबूचे किंवा नारळाच्या झावळ्यांचे छत तयार करावे.
- कक्ष उभारणीसाठी सावलीची जागा निवडावी. तसेच त्याठिकाणी चांगल्या पाण्याचा सतत पुरवठा असावा.
- कक्षाची उभारणी केल्यानंतर तळाची जागा, भिंती, मोकळ्या जागेत भरलेली वाळू व छत पाणी शिंपडून पूर्णपणे भिजवून घ्यावे.
- फळे व भाज्या ठेवण्यापूर्वी शीतकक्ष पूर्णपणे भिजलेला असावा. रोज सकाळी व संध्याकाळी कक्षावर पाणी शिंपडावे. यामुळे कक्षामध्ये योग्य तापमान व आर्द्रता टिकवून ठेवली जाते.
- पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापरही केला जातो.
शीतकक्षाचे फायदे
- फळे व भाजीपाल्याचा साठवण कालावधी वाढविण्यास मदत होते.
- कक्षातील साठवणुकीत फुले, फळे व भाजीपाला ताजा, टवटवीत राहतात.
- वनस्पतीच्या अभिवृद्धीसाठी लागणारे वनस्पतीचे भाग शीतकक्षात न सुकता उत्तम राहतात.
- शीतकक्षात अंड्यांची साठवण चांगल्याप्रकारे होते.
घ्यावयाची काळजी
- कक्षाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विटा अखंड असाव्यात. तुटलेल्या विटांचा वापर करू नये.
- वापरलेली वाळू बारीक असावी. त्यामध्ये मातीचे कण नसावेत.
- कक्ष झाकण्यासाठी तयार केलेल्या छताला छिद्रे नसावीत. छत वजनाला हलके असावे.
- कक्षावर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नये, यासाठी सावलीची जागा निवडावी.
- कक्षाची उभारणी पाण्याचा सतत पुरवठा असलेल्या जागी करावी.
- शीतकक्ष नेहमी स्वच्छ ठेवावा. कुजलेली फळे व भाज्या वेळीच काढून टाकाव्यात.
- शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२
(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
- बालाजी मेटे, ९५२७८५३१५३
(के. स. के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
- 1 of 21
- ››