वचन मोडणाऱ्या पक्षाचे हिंदुत्व मान्य नाही ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  ः वचन मोडणाऱ्या पक्षाचे हिंदुत्व मान्य नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत श्री. ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. 

 `दैनिक सामना`ला दिलेल्या मुलाखतीत  श्री. ठाकरे यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. ते म्हणाले, की सत्तास्थापनेच्या वाटाघाटीत भाजपने वचन पाळले नाही. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलो आणि हिंदुत्वात वचन पाळणे याला महत्त्व आहे. वचन जर मोडले जात असेल, तर असे हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही. एकप्रकारे चांगले चाललेले घर होते. त्यात भाऊबंदकीचे चित्रसुद्धा महाराष्ट्राने पाहिले. ही नाती अशी का तुटली, असा प्रश्न राऊत यांनी श्री. ठाकरे यांना विचारला.

त्यावर श्री. ठाकरे म्हणाले, की मी आजही सांगतो, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याकरिता जन्माला आली. त्यानंतर देशातील हिंदूवर गंडांतर येतेय, असे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आले, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला. १९८७ ची पोटनिवडणूक ही कदाचित पहिली निवडणूक असेल, जी हिंदुत्वाच्या मुद्यावर केवळ लढलीच नाही; तर जिंकलीही असेल. मग भाजप सोबत आला.  आमच्या हिंदुत्वात वचन देणे आणि वचन पाळणे याला महत्त्व आहे. वचन जर मोडले जात असेल, तर असे हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही.

‘विधान परिषद लढविणार’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे या वेळी सांगितले. श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांत त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेतील सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेचे सदस्य होण्यात आपल्याला रस आहे. माझ्यासाठी कुणीतरी विधानसभेतील आमदारकीचा राजानामा देणार असेल, ते मला मान्य नाही. संबंधित आमदार जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधानसभेत आला असेल आणि मी त्यांच्या जागेवर निवडणूक लढवली, तर त्यांच्यावर अन्याय होईल. त्यामुळे विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com