Agriculture Agricultural News Marathi grass conservation in Sidhkhed Lapali village,Dist.Buldhana | Agrowon

गाव करतेय गवतांचे संवर्धन

गोपाल हागे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गवताची रोपवाटिका
आपल्या पिढीला सुरक्षित व शाश्वत शेती देण्यासाठी झाडाप्रमाणेच गवताची लागवड व संगोपन अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही मारवेल २,५०० रोपे, पवना सात हजार रोपे आणि डोंगरी गवताची दहा हजार रोपांची लागवड केली आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून गावामध्ये दर्जेदार पौष्टीक गवताची रोपवाटिका उभी केली जात आहे.
-विमलताई कदम
(सरपंच, सिंदखेड लपाली, 
ता. मोताळा जि. बुलडाणा)

 शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले वऱ्हाडातील सिंदखेड लपाली (ता. मोताळा जि. बुलडाणा) हे गाव विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करीत आहे. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, मृदा सवंर्धन, पाणी अडविणे, पाणी जिरवणे असे उपक्रम राबवून  शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढविणे तसेच जोडधंद्यातून विकास साधणे यावर हे गावकरी भर देत आहेत.

जल, जमीन आणि जंगल या त्रिसुत्रीचा वापर करून  गाव स्वयंपूर्णतेच्या मार्गावर निघाले आहे. गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर सरपंच विमल कदम यांनी पुढाकार घेत राहुरी व पुरंदर येथून अंजन, पवना, माली कुसाडी आदी गवतांचे बियाणे आणून गावकऱ्यांच्या मदतीने लागवड केली आहे. या गवताचे संगोपन करून गावाचे ओसाड शिवार हिरवेगार करण्याचा निर्धार गावाने केला आहे. यामुळे गावातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल,तसेच दूध उत्पादन वाढविण्यासही हातभार लागणार आहे. 

सिंदखेड लपाली येथील ग्रामस्थ आता गवत काढून टाकण्याचे किंवा जाळून टाकण्याचे काम करीत नसून गावशिवारात गवताचे संगोपन करीत आहेत. गावाने वॉटर कप स्पर्धा, स्वच्छता स्पर्धांमध्ये सहभाग घेत पुरस्कार मिळविले आहेत. आता गावकरी स्वयंपुर्णतेसाठी काम करीत आहेत.
 


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...