Agriculture Agricultural News Marathi Hassan mushrif target to devendra fadenvis on political issue Nagar Maharashtra | Agrowon

फडणवीस यांनी राजभवनावरच एखादी खोली घेऊन रहावे ः हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नगर  : ‘कोरोना’चे संकट असताना भाजप आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्यात मश्‍गूल आहे. परंतु ही राजकारण करण्याची वेळ नसून संकटावर मात करण्याची आहे. देवेंद्र फडणवीस तर सातत्याने राज्यपालांकडे जाऊन तक्रारींचा पाढा वाचत आहेत. त्यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यांनी राजभवनावर एखादी खोली घेऊन रहावे, असा टोला ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नगर  : ‘कोरोना’चे संकट असताना भाजप आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्यात मश्‍गूल आहे. परंतु ही राजकारण करण्याची वेळ नसून संकटावर मात करण्याची आहे. देवेंद्र फडणवीस तर सातत्याने राज्यपालांकडे जाऊन तक्रारींचा पाढा वाचत आहेत. त्यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यांनी राजभवनावर एखादी खोली घेऊन रहावे, असा टोला ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी नगर येथे जिल्ह्यातील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोरोना’वर मात करण्यासाठी दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यात जिल्हा प्रशासन, नागरिकांचे सहकार्य असल्यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना’ची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, मुंबई-पुण्याचे लोक आल्यामुळे धोका वाढला आहे. लोकसभा अधिवेशन काळात ३५ लाख लोक विमानाने भारतात आले. ते मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणी गेले. त्यांना वेळीच क्वारंटाइन केले असते, तर १३५ कोटी लोकांना घरात बसावे लागले नसते, असा आरोपही मुश्रीफ यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला.

रेशनकार्ड नसलेल्यांनाही मोफत तांदूळ
अन्नसुरक्षा योजनेतून ८३ टक्के धान्यवाटपाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने अर्धा किलो तूरडाळ व अर्धा किलो हरभरा डाळ देण्याचे निश्‍चित केले आहे. त्याचे वाटपही लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील २५ हजार लोकांकडे रेशन कार्ड नाहीत. त्यांनाही प्रत्येकी पाच किलो तांदळाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...