Agriculture Agricultural News Marathi news regarding Brahmpuri Village development | Agrowon

विकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `आयएसओ‘ नामांकन

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.ग्रामपंचायतीने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी देण्याची सोय केली आहे. गावाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.

 

ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.ग्रामपंचायतीने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी देण्याची सोय केली आहे. गावाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.

सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर भीमा नदीकाठी ब्रम्हपुरी हे सुमारे ३३०० लोकवस्तीचे गाव आहे. मंगळवेढ्यापासून फक्त १४ किलोमीटरवरील असलेल्या या गावाला ऐतिहासिक पंरपरा आहे. प्रमुख रस्त्यावरील गाव असल्याने आणि या भागातील आठ-दहा गावाचं प्रमुख केंद्र म्हणूनही ब्रम्हपुरीची ओळख आहे. तीन वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतीचा पदभार घेतला. तेव्हापासून गावाचा विकास हाच एकमेव अजेंडा आम्ही राबविला आहे. 

ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. याचबरोबरीने अंगणवाड्या आणि शाळांनाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे. आता शाळाही डिजिटल केली आहे. आम्ही पहिल्यांदा २०१७-१८ मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभा केला.  ग्रामपंचायतीने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी देण्याची सोय केली आहे. गावाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. निर्मलग्राम योजनेतून गावात हागणदारीमुक्त गावासाठी प्रयत्न केले. आज गावातील सर्वच्या सर्व ५३८ कुटुंबाकडे स्वच्छतागृहे आहेत. तसेच गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच भूमिगत गटार योजनाही राबवली. त्यामुळे उघड्यावर कोठेच गटार राहिली नाही. 

गावात पुरातन हनुमान मंदिर आहे. सदर देवस्थानास तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळवला आहे. या योजनेतूनही मंदिराच्या परिसराचा विकास करण्यात आला आहे. तसेच गावच्या प्रमुख रस्त्यावर १८ ठिकाणी सौरदिवे लावले आहेत. रस्ते, वीज आणि पाणी हे आमचे प्रमुख विषय आहेत. याचबरोबरीने स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, महिला आणि बालकांसाठी विशेष उपक्रमही आम्ही राबवितो.

गावच्या सांडपाण्यावर ऊसशेती
गावात भूमिगत गटाराची योजना आहे. गावातील सांडपाणी या गटारातील पाइपद्वारे गावठाणात सोडले जात होते. पण याच पाण्याचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या जवळपास पाऊण एकर क्षेत्रावर ऊस करण्याचा निर्णय घेतला. त्यातून गेल्या काही वर्षात जवळपास २ लाख ६१ हजार ७८९ रुपयांचे उत्पन्न या ऊसशेतीतून मिळाले. 

विविध पुरस्कारावर मोहोर

  • तंटामुक्त गाव अभियानातून विशेष शांततेचा ३.७५ लाख रुपयांचा पुरस्कार.
  • हागणदारीमुक्त गाव अभियानासह ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरावरील तीन लाखाचा दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार.
  • विभागीय स्तरावरील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनातंर्गत ३० हजार रुपयांचा पहिला पुरस्कार.
  • स्मार्टग्राम अभियानातील तालुकास्तरावरील दहा लाखांचा पहिला पुरस्कार.

- मनोज पुजारी,७५५८२३९५८५
(  सरपंच,ब्रम्हपुरी,ता.मंगळवेढा,जि.सोलापूर)


इतर ग्रामविकास
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...