Agriculture Agricultural News Marathi news regarding farm pond in Soni village,Dist. Sangli | Agrowon

सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळी

अभिजित डाके
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात २८८ शेततळी घेतली असून सुमारे ४८९.६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.

सोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात २८८ शेततळी घेतली असून सुमारे ४८९.६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. 

 

एखादी योजना प्रभावीपणे राबविली तर ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतेच. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय सोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात दिसून आला आहे. कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात २८८ शेततळी घेतली असून सुमारे ४८९.६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील सोनी गाव. तसे पाहिले तर या गावातून म्हैसाळ उपसा योजनेचे पाणी जात असले तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या गावाची लोकसंख्या सुमारे ६,२५० इतकी असून भौगोलिक क्षेत्र १,९११ हेक्टर इतके आहे. सरासरी पर्जन्यमान ५५० मिलिमीटर आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील गावातील शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.  

 कृषी विभागाने शेततळे योजनांची माहिती गावात पोहोचवली. शाश्वत पाण्याची सोय होते, आणि याला अनुदानही मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळी घेण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये उच्चांकी संख्येने शेततळी मंजूर केली. बागायत शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत पाणीसाठा केला. गेल्या काही वर्षांत म्हैसाळ योजनेतून नियमित उपसा होऊ लागल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळले. गावशिवारात द्राक्ष, उसाचे क्षेत्र वाढले.  शासनाच्या अनुदानातून सोनी गावात २८८ शेततळी शेतकऱ्यांनी घेतली आहेत. द्राक्ष बागायतीमधून आर्थिक कायापालट करणाऱ्या सोनीच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शेततळ्यांचा आधार घेतला. संपूर्ण द्राक्ष शेतीला या शेततळ्याचा आधार मिळाला आहे.

 

  • सामुहिक शेततळी ः ३२
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना ः १५
  • एकात्मिक कडधान्य योजना ः ०७
  • मागेल त्याला शेततळे ः २३४
  • एकूण ः २८८

आमच्या भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळी घेतली आहेत.  त्यामुळे शाश्वत पाण्याची सोय झाल्याने गावात द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
— सतीश जाधव, सोनी

 

 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...