लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?

ओझोनसाठी धोकादायक ठरणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये मोलाची घट झाली असून, त्याचा फायदा हवामानासाठी होणार आहे.
ozone layer
ozone layer

सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा थराला पडलेले छिद्र भरून येत असल्याची. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी उद्योगधंदे बंद असून, सर्वत्र लॉकडाऊनचे वातावरण आहे. त्यामुळे वाहनेही रस्त्यावर नाहीत. एकूणच ओझोनसाठी धोकादायक ठरणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये मोलाची घट झाली असून, त्याचा फायदा हवामानासाठी होणार आहे.  सुमारे ३३ वर्षापूर्वी १९७ देशांनी एकत्र येत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू झाले. त्याला कारण घडले होते, ते म्हणजे १९८५ मध्ये शास्त्रज्ञांनी क्लोरोफ्लुरोफ्लुरॉनसारख्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे ओझोनच्या थराला छिद्र पडले असल्याचे शोधून काढले. त्यावर मोठे चवितचर्वण होऊन १९८७ मध्ये मॉन्ट्रियल करार पार पडला. 

ओझोनच्या थराला पडलेले छिद्र इतके धोकादायक का आहे?  शास्त्रज्ञांच्या मते, ओझोनच्या थरामुळे सूर्यप्रकाशातून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे पर्यायाने सजीवांचे संरक्षण होते. मात्र, त्यासोबत ओझोनच्या थरामुळे हवेच्या प्रवाहांमुळे लक्षणीय बदल होतात. ते पृथ्वीच्या अतिउंचावरून उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दरम्यान वाहतात. ओझोनच्या प्रमाणामध्ये घट होत असल्याने हे हवेचे प्रवाह नियमित मार्गापेक्षा दक्षिणेकडे अधिक वळत आहेत. त्यामुळे दक्षिण अमेरिका, पूर्व आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या भागातील पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे सांगितले जाते. या पावसामुळे सागरी प्रवाह आणि क्षारतेमध्येही लक्षणीय बदल घडतात. 

याबाबतची विविध संशोधने 

  • २०२० मध्ये नुकत्याच कोलोरॅडो बाऊल्डर विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये १९८० च्या तुलनेमध्ये ओझोनचे छिद्र कमी झाल्याचे मांडण्यात आले होते. अर्थात, मुख्य संशोधन अॅन्टारा बॅनर्जी यांनी अद्याप आपल्याला हवामान बदलाच्या संदर्भात मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यासाठी हरितगृह वायूच्या उत्सर्जनावर आणखी मर्यादा आणाव्या लागतील. 
  • २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालामुळे ओझोनच्या थराला पडलेल्या छिद्रे भरून येण्यासाठी २०६० वर्ष उजाडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अर्थात, काही देशांमध्ये ही प्रक्रिया तुलनेने लवकर म्हणजे २०३० पर्यंत पार पडेल, असाही दावा केला होता. 
  • ओझोन थर खरेच भरतोय का?  सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युरोप, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांमध्ये लॉकडाऊन आहे. परिणामी उद्योगधंदे बंद आहेत. रस्त्यावर वाहने नसल्याने प्रदूषण थांबले आहे. त्याचा फायदा जगभरातील अनेक शहरांमध्ये मोकळे व धूरविरहित आकाश होण्यात झाला आहे. या साऱ्या प्रक्रियांमुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा नेचर मध्ये प्रकाशित एक संशोधनामध्ये करण्यात येत आहे.  कोरोना विषाणूंमुळे सर्व जगाला एकाच वेळी तातडीने पावले उचलावी लागल्याचे काही परिणाम दिसत आहेत. अर्थात, त्याचा पर्यावरणालाही तात्पुरता फायदा होणार आहे. मात्र, अशा प्रकारची जागतिक एकी ही पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठीही होण्याची आवश्यकता या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यातून कायमस्वरूपी फायदा मिळवणे शक्य होईल. संपूर्णपणे ओझोन थर भरून येईल, हा आशावादही व्यक्त केला जात आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com