Agriculture Agricultural News Marathi news regarding turmeric cultivation by SHG, Rajapur,Dist.Ratnagiri | Page 3 ||| Agrowon

महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद लागवडीला चालना

राजेश कळंबटे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे.

सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे.

गतवर्षीच्या लागवड क्षेत्राच्या तुलनेमध्ये यावर्षी सुमारे तीन हेक्टरने वाढ झाली आहे. या लागवडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सुमारे चारशे महिला कुटुंबे सहभागी झाली आहेत. लहरी पाऊस, बदलते वातावरण, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, मजुरांची कमतरता आदी विविध कारणांमुळे काही भागात शेती पडीक राहू लागली आहे. सहकाराच्या धर्तीवर गठित झालेल्या बचत गटांमधील महिला शेतीला पुन्हा नव्याने ऊर्जितावस्था देताना उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातून तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे सात हेक्टरवर हळद लागवड केली आहे.

कोकणातील हवामान हळदीच्या सेलम जातीच्या लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे तालुक्यातील दीडशेहून अधिक बचत गटांनी या जातीची लागवड केली आहे. त्यामध्ये चारशेहून अधिक कुटुंबांचा सहभाग आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. सध्या हळद पिकाची चांगली वाढ झालेली आहे. बचत गटातील महिलांना गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा नवा आणि शाश्‍वत स्रोत सापडला  आहे. या गटाला पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा अभियान सहसंचालक नितीन माने, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, तालुका व्यवस्थापक अवधूत टाकवडे, अमित जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे.  याचबरोबरीने प्रभाग समन्वयक प्राजक्ता कदम, ओंकार तोडणकर, मंदार पवार यांच्यासह प्रभाग संघ व्यवस्थापक यांनीही सहकार्य केले.

बचत गटातील महिलांनी हळद लागवडीच्या बरोबरीने पारंपरिक आणि चारसूत्री पद्धतीने भात लागवड देखील केली आहे. यामध्ये पाचशेहून अधिक कुटुंबे बचत गटाच्या माध्यमातून सहभागी झाली आहेत. पन्नासहून अधिक गटांनी झेंडू लागवड केली आहे.


इतर ग्रामविकास
लोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
गावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...
दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...
नैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...
ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...