गावातच होणार शेती नियोजन

गावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी विषयक अडचणींचा निपटारा करण्यासाठी शासन ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करणार आहे.
farmers training in field
farmers training in field

गावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी विषयक अडचणींचा निपटारा करण्यासाठी शासन ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करणार आहे.

या समितीमध्ये गावातील कृषि व संलग्न क्षेत्राशी संबंधित किमान १२ व्यक्तींचा समावेश असणार आहे. या बाबतचा शासन निर्णय बुधवारी(ता.९) घेण्यात आला. समितीचे  पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतील.  समितीत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि तीन प्रगतिशील शेतकरी असतील. तीन पैकी एक शेतकरी महिला असेल. एक विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, दोन कृषि पूरक व्यावसायिक शेतकरी, कृषी सहायक, ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. या समितीची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल. नवीन ग्रामपंचायत गठित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत ही समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. पदसिद्ध सदस्याशिवाय इतर सदस्यांची नियुक्ती ग्रामसभेच्या मान्यतेने करावी लागणार आहे.

कृषी अधिकाऱ्यांना बैठक बंधनकारक

कृषी विभाग आणि पंचायत समितीचे तालुकास्तवरील कृषी अधिकारी गावातील बैठकांना उपस्थित राहतील. ग्रामविकास विभागातील अधिकारी देखील यात सहभागी होतील. त्यांनी गावातील कृषीविषयक समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

अशी असतील समितीची कार्ये

  • शासनाच्या कृषि विषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करणे, योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे.
  •  स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन करणे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.
  •  कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शासनाच्या कृषि विषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करणे, योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न.
  •  स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत याबाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडी संबंधी नियोजन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.
  •  कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी दर्जेदार पीक उत्पादन कसे घेता येईल या बाबतीत समिती काम करेल.
  •   शेतकऱ्यांना मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, व इतर कृषि निविष्ठा, एकात्मिक कीड नियंत्रण, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन.
  •  शेतीचे पूरक व्यवसाय दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या समितीने विशेष निमंत्रित म्हणून प्रसंगानुसार संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना बोलावणे. त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे आवश्यक.
  •  पीक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन.शेतीसाठी होणारा कर्जपुरवठा, त्यासाठी असणाऱ्या बॅंका, सहकारी संस्था इत्यादी बाबत शेतकऱ्यांना माहिती देणे. कर्ज सुलभतेने मिळण्याबाबत परतफेड करण्यासाठी समन्वय साधणे. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी उपस्थित राहण्याचे नियोजन. 
  •   स्थानिक परिस्थितीमध्ये उद्भवणारे प्रासंगिक कृषि विषयक समस्यांवर उपाययोजनेसाठी विचार विनिमय करून कृषि विभागाच्या मदतीने कार्यवाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com