Agriculture Agricultural News Marathi news regarding village and agriculture development. | Page 4 ||| Agrowon

गावातच होणार शेती नियोजन

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

गावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी विषयक अडचणींचा निपटारा करण्यासाठी शासन ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करणार आहे.

गावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी विषयक अडचणींचा निपटारा करण्यासाठी शासन ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करणार आहे.

या समितीमध्ये गावातील कृषि व संलग्न क्षेत्राशी संबंधित किमान १२ व्यक्तींचा समावेश असणार आहे. या बाबतचा शासन निर्णय बुधवारी(ता.९) घेण्यात आला. समितीचे  पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतील.  समितीत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि तीन प्रगतिशील शेतकरी असतील. तीन पैकी एक शेतकरी महिला असेल. एक विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, दोन कृषि पूरक व्यावसायिक शेतकरी, कृषी सहायक, ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल.
या समितीची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल. नवीन ग्रामपंचायत गठित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत ही समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. पदसिद्ध सदस्याशिवाय इतर सदस्यांची नियुक्ती ग्रामसभेच्या मान्यतेने करावी लागणार आहे.

कृषी अधिकाऱ्यांना बैठक बंधनकारक

कृषी विभाग आणि पंचायत समितीचे तालुकास्तवरील कृषी अधिकारी गावातील बैठकांना उपस्थित राहतील. ग्रामविकास विभागातील अधिकारी देखील यात सहभागी होतील. त्यांनी गावातील कृषीविषयक समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

 

अशी असतील समितीची कार्ये

  • शासनाच्या कृषि विषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करणे, योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे.
  •  स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन करणे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.
  •  कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शासनाच्या कृषि विषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करणे, योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न.
  •  स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत याबाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडी संबंधी नियोजन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.
  •  कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी दर्जेदार पीक उत्पादन कसे घेता येईल या बाबतीत समिती काम करेल.
  •   शेतकऱ्यांना मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, व इतर कृषि निविष्ठा, एकात्मिक कीड नियंत्रण, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन.
  •  शेतीचे पूरक व्यवसाय दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या समितीने विशेष निमंत्रित म्हणून प्रसंगानुसार संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना बोलावणे. त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे आवश्यक.
  •  पीक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन.शेतीसाठी होणारा कर्जपुरवठा, त्यासाठी असणाऱ्या बॅंका, सहकारी संस्था इत्यादी बाबत शेतकऱ्यांना माहिती देणे. कर्ज सुलभतेने मिळण्याबाबत परतफेड करण्यासाठी समन्वय साधणे. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी उपस्थित राहण्याचे नियोजन. 
  •   स्थानिक परिस्थितीमध्ये उद्भवणारे प्रासंगिक कृषि विषयक समस्यांवर उपाययोजनेसाठी विचार विनिमय करून कृषि विभागाच्या मदतीने कार्यवाही.

इतर ग्रामविकास
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
चला, झाडांच्या गावाला जाऊया...गावातील सर्व घरावरील छताच्या पाण्याचे रेन वॅाटर...
प्राथमिक निवड झाल्यानंतर गाव, संस्थेने...आदर्शगाव योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड...