Agriculture Agricultural News Marathi news regarding watershed development in Deshvandi Village,Dist.Nashik | Agrowon

लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदार

मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

कमी पैशात एवढे मोठे काम होऊ शकते,ही आनंदाची बाब आहे.तांत्रिक निकष पाळून ही कामे केली.त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला.ज्या गावांमध्ये अशा टेकड्या आणि पडीक जमीन आहे, त्या ठिकाणी पाण्याची गरज भागवू शकेल असे स्रोत निर्माण करता येईल.
— प्रा.अशोक सोनवणे

जिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात वसलेले दुष्काळी गाव. येथे पिकांसाठी सिंचन तर दूरच, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला अन हे गाव अवघ्या दोन वर्षात पाणीदार करण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

पाणी हा अशोक सोनवणे यांच्या अभ्यासाचा विषय आहे.येथील गावकऱ्यांनी त्यांना गावातील पडीक दोन टेकड्यांवर जलसंधारणाची कामे करण्याची परवानगी दिली.त्यानंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन त्यांनी मोजमाप करून जलमृद्संधारण तंत्रानुसार कामाची आखणी केली. गावातील दोन टेकड्यांवर समतल चर खोदले. कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान न घेता तसेच गावकऱ्यांकडून निधी संकलित न करता हे परिवर्तन त्यांनी घडविले आहे. 

विविध समाज घटकांकडून जमलेल्या सुमारे ८० हजार रुपयांतून येथे १५ हजार मीटर समतल चरांच्या निर्मितीचे काम तपशीलवार झाल्याने कमी पावसाच्या प्रदेशात १० कोटी लिटर पेक्षा जास्त पाण्याचे जलसंधारण होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने चर पाण्याने भरले आहे. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचे संधारण करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या कामातून भूगर्भातील पाणी पातळी वाढ करण्यासह मृद्संधारणाच्या प्रयत्नाला यश आले आहे.''जल है, तो कल है'' हा विचार घेऊन लोकसहभाग आणि काटेकोर नियोजन असल्यास समाजहिताच्या दृष्टीने आदर्श काम उभे करता येते हे यातून सिद्ध झाले आहे.

याकामी युवामित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी विनामोबदला खोदकामासाठी यंत्रणा  उपलब्ध करून दिली.यासह अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ.भाऊसाहेब मोरे,निवृत्त पोलिस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी, उद्योजक विजय पाटील,मुकुंद पाटील आदींच्या माध्यमातून सुमारे ८० हजार रुपये लोकवर्गणी जमा झाली. 

असे आहे कामाचे स्वरूप

  • ३० हेक्टर आणि ६८ हेक्टर अशा दोन टेकड्यांवर सलग समतल चर खोदण्याचे काम.
  • चरांची लांबी १५ हजार मीटरपेक्षा जास्त.
  • चरांची खोली व रुंदी प्रत्येकी ३ फूट .
  • खोल स्वरूपाचे सलग समतल चर खोदल्यामुळे या दोन्ही टेकड्यांवर सुमारे १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संधारण.

 

 


इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...