Agriculture Agricultural News Marathi news regarding watershed development in Kolpandhri Village,Dist.Nandurbar | Page 3 ||| Agrowon

जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

 कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थ आणि पाणी फाउंडेशन यांच्या मदतीने मागील काही वर्षांमध्ये गावात जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्याचे दृश्‍य परिणाम गेल्या व यंदाच्या पावसाळ्यात दिसत आहेत.

 कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थ आणि पाणी फाउंडेशन यांच्या मदतीने मागील काही वर्षांमध्ये गावात जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्याचे दृश्‍य परिणाम गेल्या व यंदाच्या पावसाळ्यात दिसत असून, ३० टक्के शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेणे शक्य झाले आहे.

कोळपांढरी हे गाव शहादा तालुका आणि  मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. मध्य प्रदेशातील पानसेमल आणि शहादा तालुक्यामधील मंदाणे गाव परिसर या गावापासून नजीक आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हे गाव असून, १०० टक्के आदिवासी बांधव, शेतकरी या गावात आहेत. गावाचे क्षेत्र १६१ हेक्टर आहे. लोकसंख्या सुमारे ६०० आहे. पूर्वी फक्त खरिपात मका, मूग, उडीद आदी पिके घेणे शक्य होत होते. पावसात पाणी वाहून जायचे. ते थांबत नसल्याने किंवा त्याचा संचय होत नसल्याने पाणीटंचाई अनेकदा निर्माण व्हायची. पाऊस कमी झाला तर स्थिती आणखी बिकट बनायची. अशा स्थितीत ग्रामस्थ एकत्र आले. 

राज्य शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ कृषी अधिकारी कैलास मोते हे  याच गावातील आहेत. गावात जलसंधारणासाठी श्री.मोते यांनी पुढाकार घेतला आणि तांत्रिक मदत केली. पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील यांनी जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. जल,मृद संधारणाचे आराखडे तयार केले. गावात २०१९ मध्ये सुमारे १५ लाख रुपये खर्चून १७ शेततळी, सीसीटी, डीप सीसीटी, कर्पाटमेंट बंडिंग, तलावातील गाळ काढणे आदी कामे घेण्यात आली. ग्रामस्थांनीदेखील सुमारे दीड लाख रुपयांची मदत केली. गेल्या पावसाळ्यातच शेततळ्यात पाण्याचा चांगला संचय झाल्याने एका शेतकऱ्याने मत्स्यपालन केले. यातून चार महिन्यात निव्वळ २० हजार रुपये नफा त्यांनी मिळविला. 
जलसंधारणाच्या कामांसाठी सरपंच रमेश पावरा, बाबूलाल पावरा, कांतिलाल पावरा आदी अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी मदत केली. सर्वांच्या सहभागामुळे कामे योग्य पद्धतीने झाली. यामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी वाढली.  रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होवू लागले आहे. गेल्या वर्षी गावातील ३० टक्के शेतकऱ्यांनी खरिपानंतर रब्बीमध्ये हरभरा, मका लागवड केली होती. यंदाही मका, हरभरा या पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे.


इतर ग्रामविकास
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...