Agriculture Agricultural News Marathi news regarding watershed management work in Kothli village,Dist.Nandurbar | Agrowon

लोकसहभागातून दुष्काळावर केली मात

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

 कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई समस्या युवकांनी जल-मृद्संधारणासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून दूर झाली आहे. गेल्या दोन वर्षात शोषखड्डे, नाला खोलीकरण अशी जल-मृदा संधारणाची कामे झाली.

 कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई समस्या युवकांनी जल-मृद्संधारणासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून दूर झाली आहे. गेल्या दोन वर्षात शोषखड्डे, नाला खोलीकरण अशी जल-मृदा संधारणाची कामे झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील या उपक्रमासाठी मदत केली आहे.

कोठली गावाची लोकसंख्या सुमारे साडेपाच हजार आहे. गावात मध्यम व काळी कसदार जमीन आहे. गावातील अनेक शेतकरी कापूस आणि मिरची उत्पादनात अग्रेसर आहेत. परंतु २०१९ पूर्वी सलग पाच वर्षे पाऊस कमी  झाल्याने गावातील लघुप्रकल्प, तलाव कोरडे पडले. मिरचीची शेती उजाड झाली. कुणीही शेतकरी रब्बी हंगाम घेऊ शकत नव्हता. पाणीटंचाई एवढी होती की, एक वेळही सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होऊ शकत नव्हता. हे संकट दूर व्हावे यासाठी गावातील युवक एकत्र आले. त्यांनी पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशनने ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, तेथे भेट दिली. लोकांशी संवाद साधला. गावातील तरुणांना ब्राह्मणपुरी (ता.शहादा, जि.नंदुरबार) येथील जलसंधारणाच्या कामात अग्रेसर असलेले अनिल पाटील, अंशुमन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. जलसंधारणाच्या कामासाठी गावामधील ३५ युवकांनी जलमित्र टीम स्थापन केली. ब्राह्मणपुरी येथेही युवकांनी भेट देऊन कोठली गावामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली.

जल-मृदा संधारणाला सुरुवात 
पाणी फाउंडेशनच्या लामकानी (ता.धुळे) येथे झालेल्या कार्यशाळेत (प्रशिक्षण)  गावातील चार तरुणांनी सहभाग नोंदविला. जलसंधारणातील तांत्रिक बाबी या प्रशिक्षणातून समजून घेतल्या आणि गावशिवारात जल,मृदा संधारणाच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला गावात ६०० शोषखड्डे तयार केले. त्यातच सांडपाणी जिरवण्याची व्यवस्था केली. नंतर गावातील नाल्याचे खोलीकरण सुरू केले. या नाल्याकाठी गावातील मिरची, कापसाखालील कमाल क्षेत्र असते. सुमारे २२ लाख रुपये वर्गणी ग्रामस्थांनी गोळा केली. तसेच ग्रामपंचायतीनेदेखील पुढाकार घेऊन १० लाख रुपये मदत दिली. नाम फाउंडेशनच्या मदतीने यंत्रणा उपलब्ध झाली. यामुळे नाला खोलीकरणाचे काम जलदगतीने झाले. 
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात नाल्यात चांगला पाणीसाठा झाला, त्याच वर्षी शिवारातील कूपनलिका, विहिरींची जलपातळी वाढली. ज्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या, त्यांनाही पाझर फुटला. गेल्या हंगामात रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी पीक लागवडदेखील केली. यंदाही चांगला पाणीसाठा जलसंधारणाच्या कामांमुळे दिसत आहे. पाणी फाउंडेशनने युवकांच्या कामाची दखल घेतली. फाउंडेशनने मुंबई येथील जाहीर कार्यक्रमात गावातील जलमित्र टीमचा सत्कार केला.


इतर अॅग्रो विशेष
पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
 ‘आरओ प्लांट’ अन् सेंद्रिय स्लरीनिर्मितीक्षेत्र ६५ एकर असल्याने मजूरटंचाईवर मात...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज...२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...