Agriculture Agricultural News Marathi news watershed development work in Satara district. | Agrowon

जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मात

विकास जाधव
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

आजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जातात. परंतू आता या तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण मोहीम उपयुक्त ठरली.

आजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जातात. परंतू आता या तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारण मोहीम उपयुक्त ठरली. खटाव तालुक्यातील अनेक गावांनी या मोहिमेतून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात केली आहे.

जाखणगाव, गादेवाडी, आमलेवाडी, साळुखेवस्ती, रामोशीवस्ती (मेघलदरे वाडी) या गावांनी गेल्या काही वर्षांपासून जलसंधारण व मृद्संधारण कामांची परिणामकारक अंमलबजावणी करत टँकरमुक्ती बरोबर  वनसंपत्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण केली. जांबपासून ते खटावपर्यंत शासन, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही वर्षापासून जलसंधारणाची चळवळ राबवली. गावशिवारातील ओढ्यांवर सिमेंट व मातीचे लहानमोठे ४१ बंधारे बांधण्यात आले. त्याबरोबरच ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामातून एक लाख ८० हजार घनमीटर गाळ पडीक जमिनीवर पसरण्यात आला.

काठावरील माती पुन्हा ओढ्यात वाहून जाऊ नये म्हणून सुमारे चार वर्षापूर्वी गावकऱ्यांनी अत्यंत कल्पकतेने दोन्ही बाजूला बांबूची रोपे लावली. या रोपांचे मोठ्या बेटात रूपांतर झाले आहे. भविष्यात या बांबूपासून चांगले उत्पन्न मिळणार आहे. गाव परिसरात ४१ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आले. या गावांमध्ये जलसंधारण व मृद्संधारणाची कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याने बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे.  सर्व बंधाऱ्यामध्ये अंदाजे १८० टी.सी.एम पाणी साठू शकते असे कृषी अधिकारी किरण काळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...