Agriculture Agricultural News Marathi Order for appointment of Administrator on Gram Panchayats Amaravati Maharashtra | Agrowon

अचलपूरमधील ४० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

अमरावती   ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदी काळात निवडणूका घेणे शक्‍य नसल्याने अचलपूर तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्‍ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अमरावती   ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदी काळात निवडणूका घेणे शक्‍य नसल्याने अचलपूर तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्‍ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुदत संपलेल्या अचलपूर तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला निवडणूक होणार होती. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया देखील पार पडली. यादरम्यान देशाअंतर्गंत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमालाही बसला आहे.

या निवडणूका अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. अचलपूर तालुक्‍यातील कांडली, परसापूर, निमकुंड, निंभारी, टवलार, घोडगाव, खरपी, नायगाव, एकलासपूर, धामणगाव गढी, हनवतखेडा, येवता, चौसाळा, खैरी, वडनेर, भुजंग, कविठा बु., दर्याबाद, येसुर्णा, कुष्ठा बु., कुष्ठा खुर्द, कोल्हा, अंबाडाकंडारी, नारायणपूर, रासेगाव, पथ्रोट, बोरगाव पेठ, शिंदी बु., वडगाव फत्तेपूर, सावळापूर, धोतरखेडा सालेपूर, बोरगाव दोरी, हरम आदी ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्यामुळे तेथे प्रशासक नेमले जाणार असल्याची माहिती अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी दिली.

यातील काही ग्रामपंचायतींवर बुधवारी (ता.६) तर काही ग्रामपंचायतींवर शनिवारी (ता.९) प्रशासकांची नियुक्‍ती केली जाणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...