Agriculture Agricultural News Marathi order to Suspend District Supply Officers of Nagpur, Gadchiroli Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नागपूर, गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करा : मंत्री छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असे आदेश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत.

नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असे आदेश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित होणाऱ्या धान्याची नियमितपणे पाहणी करीत असता. आता प्राप्त झालेल्या तांदूळ व डाळीचे नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून नमुने पाहणीसाठी मागवले असता त्यांना तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता नाशिक जिल्ह्यात नागपूर येथील गोदामातून तांदूळ प्राप्त झालेला असून नागपूर गोदामात आलेला तांदूळ हा गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मधून प्रक्रिया होऊन प्राप्त झाल्याची त्यांना माहिती मिळाली.

राज्यात लॉकडाउनच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने शासनाची बदनामी होत आहे. तसेच गरजू लाभार्थी देखील लाभापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब त्यांनी सचिवांना निदर्शनास आणून देत निकृष्ट प्रतीचा तांदूळ ताब्यात घेऊन गोदामात साठवणुकीसाठी जबाबदार असणारे तपासणीस तसेच या कामी संनियंत्रण करण्यासाठी जबाबदार असलेले गडचिरोली आणि नागपूरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच ज्या राईस मिलमधून प्रक्रिया केलेला निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झालेला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करण्यात यावी,असे आदेश त्यांनी सचिवांना दिले.

त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांतून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून सर्व गोदामांची सखोल तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश मंत्री भुजबळ यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...