जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गती
गेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले. पहिल्यांदाच सरपंच झाल्याने जबाबदारी वाढली आहे. विद्यमान उपसरपंच व अन्य सदस्यांच्या सहाय्याने मी गावच्या विकासात सक्रियपणे काम करीत आहे. विशेष करून महिला विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचे मी ठरविले आहे. याला इतर सदस्यांनीही चांगला पाठिंबा दिला आहे.
गेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले. पहिल्यांदाच सरपंच झाल्याने जबाबदारी वाढली आहे. विद्यमान उपसरपंच व अन्य सदस्यांच्या सहाय्याने मी गावच्या विकासात सक्रियपणे काम करीत आहे. विशेष करून महिला विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचे मी ठरविले आहे. याला इतर सदस्यांनीही चांगला पाठिंबा दिला आहे.
आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे वर्षभर आयोजन करीत असतो. गावामध्ये किशोरवयीन मुलींसाठी विविध तज्ज्ञांची व्याख्याने होतात. याशिवाय स्तनदा मातांसाठी मार्गदर्शन शिबिरही होते. ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रत्येक घरातील महिलेची आरोग्य तपासणी होते. लसीकरण केले जाते. यामध्ये गंभीर असलेल्या महिलांना पुढील उपचारांचा सल्ला दिला जातो.
लोकसहभागातून विकास
विकासकामांमध्ये दिव्यांगांना घरफाळ्यात सवलत, गांडूळखत प्रकल्प, ग्रामपंचायतीचा स्वत:चा आर ओ प्लॅन्ट, शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव या योजना आम्ही राबविल्या आहेत. गावात सुमारे पाचशे कुटुंब संख्या आहे. प्रत्येक घरात शौचालये आहेत. बाहेरुन येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र शौचालये बांधून गावात स्वच्छता राहील, याबाबत काळजी घेण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या विरुंगळ्यासाठी ऑक्सिजन पार्कची उभारणी ग्रामपंचायतीने केली आहे. गावातील लोकांना पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी मीटरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातून पाण्याची मोठी बचत होत आहे. गावामध्ये २००९ पासून गांडूळखत योजना सुरू आहे. ही योजना चांगली चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भविष्यात गावाला लाभदायक ठरतील, अशा अनेक योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये गावशिवारात वृक्षारोपण करणे, यांसह शेती आणि ग्राम विकासाच्या योजना राबविण्याचा विचार आहे. गावाने विविध स्वच्छता स्पर्धेत भाग घेतला असून यात यश मिळविले आहे.
बचत गटातून प्रगती
आरोग्यविषयक कामे करताना महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल याकडेही ग्रामपंचायतीने लक्ष दिले आहे. महिलांना वेगवेगळ्या पूरक उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येते. यातून अनेक महिलांनी स्वत: पूरक उद्योग सुरू करून कुटुंबाला हातभार लावण्यास प्रारंभ केला आहे. गावात चाळीसहून अधिक बचत गटाच्या माध्यमातून चारशे महिला कार्यरत आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा लाभ देणे व अन्य मदतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. महिलांसाठी गावामध्ये स्वतंत्र बसस्टॉप, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे ठेव असा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. लोकसहभागातून गाव विकासाची दिशाही ठरविली आहे.
- सौ. सुप्रिया कांबळे, ८६९८३८१२७७
फोटो गॅलरी
- 1 of 1022
- ››