Agriculture Agricultural News Marathi rural development work in Nangnur village,Dist.Kolhapur | Agrowon

महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गती

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

गेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले. पहिल्यांदाच सरपंच झाल्याने जबाबदारी वाढली आहे. विद्यमान उपसरपंच व अन्य सदस्यांच्या सहाय्याने मी गावच्या विकासात सक्रियपणे काम करीत आहे. विशेष करून महिला विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचे मी ठरविले आहे. याला इतर सदस्यांनीही चांगला पाठिंबा दिला आहे.

गेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले. पहिल्यांदाच सरपंच झाल्याने जबाबदारी वाढली आहे. विद्यमान उपसरपंच व अन्य सदस्यांच्या सहाय्याने मी गावच्या विकासात सक्रियपणे काम करीत आहे. विशेष करून महिला विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचे मी ठरविले आहे. याला इतर सदस्यांनीही चांगला पाठिंबा दिला आहे.

आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे वर्षभर आयोजन करीत असतो. गावामध्ये किशोरवयीन मुलींसाठी विविध तज्ज्ञांची व्याख्याने होतात. याशिवाय स्तनदा मातांसाठी मार्गदर्शन शिबिरही होते. ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रत्येक घरातील महिलेची आरोग्य तपासणी होते. लसीकरण केले जाते. यामध्ये गंभीर असलेल्या महिलांना पुढील उपचारांचा सल्ला दिला जातो.

लोकसहभागातून विकास 
विकासकामांमध्ये दिव्यांगांना घरफाळ्यात सवलत, गांडूळखत प्रकल्प, ग्रामपंचायतीचा स्वत:चा आर ओ प्लॅन्ट, शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव या योजना आम्ही राबविल्या आहेत. गावात सुमारे पाचशे कुटुंब संख्या आहे. प्रत्येक घरात शौचालये आहेत. बाहेरुन येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र शौचालये बांधून गावात स्वच्छता राहील, याबाबत काळजी घेण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या विरुंगळ्यासाठी ऑक्सिजन पार्कची उभारणी ग्रामपंचायतीने केली आहे.  गावातील लोकांना पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी मीटरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातून पाण्याची मोठी बचत होत आहे. गावामध्ये २००९ पासून गांडूळखत योजना सुरू आहे. ही योजना चांगली चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भविष्यात गावाला लाभदायक ठरतील, अशा अनेक योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये गावशिवारात वृक्षारोपण करणे, यांसह  शेती आणि ग्राम विकासाच्या योजना राबविण्याचा विचार आहे. गावाने विविध स्वच्छता स्पर्धेत भाग घेतला असून यात यश मिळविले आहे.

बचत गटातून प्रगती 
 आरोग्यविषयक कामे करताना महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल याकडेही ग्रामपंचायतीने लक्ष दिले आहे. महिलांना वेगवेगळ्या पूरक उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येते. यातून अनेक महिलांनी स्वत: पूरक उद्योग सुरू करून कुटुंबाला हातभार लावण्यास प्रारंभ केला आहे. गावात चाळीसहून अधिक बचत गटाच्या माध्यमातून चारशे महिला कार्यरत आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा लाभ देणे व अन्य मदतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. महिलांसाठी गावामध्ये स्वतंत्र बसस्टॉप, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे ठेव असा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. लोकसहभागातून गाव विकासाची दिशाही ठरविली आहे.

- सौ. सुप्रिया कांबळे, ८६९८३८१२७७
 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
शहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...
ग्रामस्वच्छता, जलसंधारणातून मधापुरीची...सामूहिक प्रयत्नातून गावाचा कसा कायापालट करता येऊ...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
स्मार्ट गावाच्या दिशेने...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...
जल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेनेउत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील...
नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी...नगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) गावाची वाटचाल...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...