Agriculture Agricultural News Marathi success story of Avdhut Barve,Hirvetarphe,Dist.Pune | Agrowon

नारायणगावची कलिंगडे पोहोचली काश्‍मीर बाजारपेठेत

गणेश कोरे
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोना टाळेबंदीत शेतीमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर अडचणीत आलेले प्रयोगशील शेतकरी अवधूत बारवे यांनी हतबल न होता थेट जम्मू-काश्मीरच्या बाजारपेठेत कलिंगड पाठवले. सध्याच्या काळात कलिंगडास जेथे किलोस चार रुपये दर मिळणे अशक्य होते, तेथे साडेसात रुपये दर मिळवीत त्यांनी एकरी दीड लाखांचा नफा मिळवला. टाळेबंदीतही त्यांनी नवीन बाजारपेठ शोधली.

कोरोना टाळेबंदीत शेतीमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर अडचणीत आलेले प्रयोगशील शेतकरी अवधूत बारवे यांनी हतबल न होता थेट जम्मू-काश्मीरच्या बाजारपेठेत कलिंगड पाठवले. सध्याच्या काळात कलिंगडास जेथे किलोस चार रुपये दर मिळणे अशक्य होते, तेथे साडेसात रुपये दर मिळवीत त्यांनी एकरी दीड लाखांचा नफा मिळवला. टाळेबंदीतही त्यांनी नवीन बाजारपेठ शोधली.

हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर,जि.पुणे) येथील अवधूत बारवे यांनी सात एकर क्षेत्रावरील द्राक्षाच्या रूट स्टॅक बागेत आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड केली. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी एकरी ५० हजार रुपये भांडवली खर्च झाला होता. लॉकडाऊनमुळे व्यापारी उपलब्ध नसल्याने तालुक्‍यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मागील महिन्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बारवे देखील चिंतेत होते.

याच दरम्यान बारवे यांना टाळेबंदीत पुरवठा साखळी खंडीत झाल्याने रमजानच्या काळात श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर भागात फळांची टंचाई असल्याची माहिती समजली. त्यांनी कांदळीचे व्यापारी बाबूलाल पठाण यांच्याद्वारे श्रीनगरमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. बारवे यांची कलिंगडे चांगल्या दर्जाची असल्याने प्रति किलो साडेसात रुपये या दराने कलिंगडे खरेदीची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली. मागील आठ दिवसांत श्रीनगर येथील व्यापाऱ्यांनी बारवे यांच्या शेतातून सुमारे दोनशे चाळीस टन कलिंगडे खरेदी केली. त्यामुळे बारवे यांचे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले. या कलिंगड विक्रीतून बारवे यांनी खर्च वजा जाता एकरी दीड लाखांचा नफा मिळविला.

नवीन बाजारपेठेबाबत बारवे म्हणाले की, मी गेल्या दहा वर्षांपासून दुबईला सीताफळांची निर्यात करत आहे. सीताफळाच्या अनुभवामुळे यंदा मी रमजान सणासाठी दुबईला कलिंगड निर्यात करण्याचे नियोजन केले. यंदा सात एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड देखील केली. यंदा दुबई बाजारपेठेत मला प्रति किलोस १५ ते २० रुपये दर मिळणार होता. मात्र कोरोना टाळेबंदीत निर्यातीसह देशांतर्गत आणि स्थानिक शेतीमाल पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर मोठ्या नुकसानीचा धोका निर्माण झाला. मात्र हताश न होता नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी मी नवीन बाजारपेठ शोधत होतो. विविध मार्गांनी चौकशी करीत मी जम्मू काश्मीर बाजारपेठेत प्रति किलोस साडेसात रुपये दर मिळविला. सध्याच्या परिस्थितीत अपेक्षित फायदा झाला नसला, तरी नुकसान टाळण्यात यशस्वी झालो. परराज्यातील नवीन बाजारपेठ देखील मिळवली.

संपर्क ः अवधूत बारवे, ९८६०३९०१३७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...