Agriculture Agricultural News Marathi success story of Bahirwadi,Dist.Nagar | Agrowon

कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली किर्ती

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण शेतीत अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी गाव शिवारात कांद्याचे सुमारे साडेतीनशे हेक्टरवर तर लसणाचे  चाळीस हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस वर्षांपासून या दोन्ही पिकांचे उत्पादन घेणारे या भागातील बहिरवाडी हे एकमेव गाव असावे.

बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण शेतीत अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी गाव शिवारात कांद्याचे सुमारे साडेतीनशे हेक्टरवर तर लसणाचे  चाळीस हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस वर्षांपासून या दोन्ही पिकांचे उत्पादन घेणारे या भागातील बहिरवाडी हे एकमेव गाव असावे. दुष्काळी पट्यातील या गावच्या परिसरात पाणलोटाची कामे झाली. कांदा, लसूण उत्पादनातील गावची किर्ती ऐकून येथे दरवर्षी हजारो शेतकरी येथे भेटी देतात. 

नगर- औरंगाबाद रस्त्यावर पूर्वेला पाच किलोमीटरवर बहिरवाडी गाव आहे. हा भाग पूर्वी तसा दुष्काळी होता. मात्र गाव शिवारात अलीकडे झालेल्या पाणलोटाच्या कामांमुळे गावाला बरकत येऊ लागली आहे. गावात साधारण तीनशे कुटुंबे आहेत. एखादा अपवाद वगळला तर बहुतेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. लसणाच्या प्रायोगिक शेतीत गावातील विष्णू जरे यांनी ओळख तयार केली आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कांदा-लसूण संशोधक केंद्रातील शास्त्रज्ञांसह विविध भागातील शेतकऱ्यांनी गावाला भेटी दिल्या आहेत.

कांदा, लसणाची परंपरा  
गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस वर्षापेक्षा अधिक काळ गावाला कांदा व लसूण शेतीची परंपरा आहे. दरवर्षी एकूण साधारण आठ ते दहा हजार टनांपर्यंत कांदा तर लसणाचे दीड ते दोन हजार टन उत्पादन मिळते. गावासह परिसरातील ससेवाडी, जेऊर, इमामपुर आदी गावेही या शेतीत प्रसिद्ध आहेत. कांदा, लसणाची विक्री नगर, घोडेगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये केली जाते. काही वेळा व्यापारीही गावात खरेदीसाठी येतात. कांदा- लसणाच्या शेतीतून गावातील अर्थकारण दरवर्षी कोट्यावधीच्या घरात जाते. गेल्यावर्षी राज्यात व देशातही कांद्याला मागणी आणि दरही चांगला राहिला. गावाला कांदा विक्रीतून सुमारे वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. कांद्याचे दर पडले तर मात्र  उत्पादकांना आर्थिक फटका सोसावा लागतो. 

बीजोत्पादन आणि रोपवाटिका 
साधारण डिसेंबर, जानेवारीत कांद्याला बऱ्यापैकी दर असतो हा कांदा उत्पादकांचा अनुभव. त्यामुळे बहिरवाडी शिवारात लेट खरीप लागवडीवरच अधिक भर असतो. मृगाचा पाऊस पडला की मुगाची पेरणी केली जाते. त्याच वेळी कांदा रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार केली जाते. अनेक शेतकरी स्वतःच रोपे तयार करतात. येथे अनेक वर्षे कृषी साहाय्यक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब आठरे यांच्या प्रयत्नातून रोपे तयार करून त्याची लागवड करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातून उत्पादनात वाढ झाली. पूर्वी एकरी साधारण सात ते नऊ टन कांदा उत्पादन व्हायचे. आता ते योग्य व्यवस्थापन व अनुकूल हवामानातून बारा ते पंधरा टनांपर्यंत पोचले असल्याचे आठरे यांनी सांगितले. लसणाचेही येथे कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ग्राम बीजोत्पादन घेतल्याचे मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे यांनी सांगितले.  

लसणाच्या बियाण्याची सर्वदूर विक्री
बहिरवाडीत लसूण उत्पादक कांद्याच्या तुलनेत कमी आहेत. येथे साधारण ऑक्टोबरमध्ये लागवड केली जातो. साधारण पंधरा हेक्टरवर लसूण बीजोत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातून येथील लसणाच्या बियाण्याला मागणी असते. मागणीनुसार शेतकरी बियाणे पॅकिंग करून पाठवतात.   

शेकडो मजुरांना रोजगार 
बहिरवाडीतील माणसे कधीकाळी रोजगारासाठी अन्य गावी जायची. आता गावानेच कांदा- लसणाच्या शेतीतून शेकडो मजुरांना रोजगार दिला आहे. लागवडीसाठी येथे दोन ते अडीच महिने विविध भागातून  पाचशेपेक्षा अधिक मजुरांची येथे नियमित रेलचेल असते.   

जलसंधारणातून गावाला आली बरकत 
नगर तालुक्यातील बहुतांशी दुष्काळी भागात हुलगे, बाजरी, तूर, मूग, ज्वारी अशी पावसावर अवलंबून असलेली पिके घेतली जातात. या भागाचे तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या प्रयत्नातून १९७९ साली जलसंधारणाची कामे झाली. त्यानंतरही वेळोवेळी सिमेंट बंधारे, नाला बंडीग, गतिमान पाणलोट, बांधबंदिस्ती, नाला रुंदीकरण, जलयुक्त शिवार अभियानातून विविध कामे झाली. गावच्या शिवारातून वाहून जाणारे पाणी गावकऱ्यांनी एकोप्याने अडवले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले आणि गाव शिवाराला बरकत आली. पडीक जमीन वहितीखाली आली. कोरडवाहू पिके घेणारे शेतकरी कांदा, लसणासारख्या पिकांकडे वळले असे सरपंच विलास काळे यांनी सांगितले. 

बहिरवाडी दृष्टिक्षेपात 

  •   भौगोलिक क्षेत्र- ९७३ हेक्टर
  •   वनविभागाचे क्षेत्र- २५० हेक्टर
  •   पेरणीयोग्य क्षेत्र- ६५६ हेक्टर
  •   रब्बीत लसूण लागवडीखालील क्षेत्र- ४१ हेक्टर 
  •   शेतकरी संख्या- सुमारे ७०
  •   खरिपातील कांदा लागवड -   ८ हेक्टर
  •   रब्बी कांदा लागवडीचे क्षेत्र -  ३२० हेक्टर 
  •   शेतकरी संख्या -  सुमारे ३९५

 

आम्ही गावांत पाणलोट, जलसंधारणाची कामे करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे गावशिवार पाणीदार झाले. त्याचा कांदा, लसूण शेतीला फायदा होत आहे. गावाची त्यातूनच वेगळी ओळख निर्माण झाली. 
— विकास काळे, सरपंच, बहिरवाडी 

कृषी विभागाने गावात सातत्याने विविध उपक्रम राबवून कांदा, लसूण शेतीला चांगली चालना दिली आहे. 
 — शिवाजीराव जगताप, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

आमच्या गावाने अनेक वर्षांपासून कांदा, लसणाच्या शेतीतून जिल्ह्यात नाव तयार केले आहे याचा आम्हांला अभिमान आहे. गावाचा अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन कांदा व लसूण लागवड सुरू केली आहे. 
— विष्णू जरे, ९७६४०३८२५५
लसूण उत्पादक, बहिरवाडी 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...