Agriculture Agricultural News Marathi success story of Baripad Village,Dist.Dhule | Page 3 ||| Agrowon

बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती, सौरशक्ती

मनोज कापडे
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि ग्रामविकासामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लोक सहभागाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांनी चांगली साथ दिली आहे. 

बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि ग्रामविकासामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लोक सहभागाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांनी चांगली साथ दिली आहे. 

धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे निसर्गरम्य गाव हे शाश्वत ग्रामविकासाची पंढरी समजले जाते. गावाला दिशा देण्याचे काम प्रयोगशील शेतकरी चैत्राम पवार यांनी केले आहे. एक हजार लोकवस्तीच्या या गावाला चांगले भौगोलिक क्षेत्र लाभले आहे. गावकऱ्यांनी शेती, जंगल आणि पर्यावरण जपले आहे. आता गावाने सौरशक्ती चळवळ सुरू केली आहे. गावातील विविध उपक्रमांना विविध स्वयंसेवी संस्थांची चांगली साथ आहे.

 पर्यावरण सुविधा केंद्र 
बारीपाडा गावाने १९९२ पासून विविध प्रयोग करण्यास सुरूवात केली. या ग्रामविकासाच्या चळवळीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने  देशभरातील अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकऱ्यांच्या भेटी वाढल्या. त्यामुळे २०१४ मध्ये गावातील पर्यावरण उपक्रमांची माहिती करून देणारे पर्यावरण सुविधा केंद्र उभारले गेले. आदिवासी विकास विभागाने यासाठी २५ लाखांचा निधी दिला. या केंद्राला पाणी पुरविण्यासाठी सौर प्रणाली बसविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्याला देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनने मदत केली. संस्थेने २०१४ मध्ये दोन अश्वशक्तीचा पहिला सौर पंप गावात बसविला. हा पंप गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरला. तेथून पुढे बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावात सौरशक्ती चळवळीची बीजे रोवली गेली, असे चैत्राम पवार सांगतात.

  सौरऊर्जेच्या दिशेने प्रवास 
सौरऊर्जेचे महत्त्व शेतकऱ्यांना कळल्यामुळे गावाने याचा पाठपुरावा करण्याचे ठरविले. आदिवासी विकास विभागाने गावात सौर गृहदीप योजना आणली. त्यातून २०० घरांवर ७५ वॅटचे सोलर पॅनेल लावले गेले. प्रत्येक पॅनलवर १२ वॅटची बॅटरी बसवली. त्यातून घरात चार दिवे दिले गेले. या योजनेमुळे लोडशेडिंग असतानाही गावात वीज मिळू लागली. ग्रामविकास चळवळींना पाठिंबा देणारे अहमदाबादमधील सुनील त्रिवेदी यांनी अहमदाबादमधील मिनाक्षी मेहता फाउंडेशन या संस्थेशी जोडून दिले. या संस्थेने शेतकरी गटांना ३२ सौर पंप पुरविण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक उभारणी सहज सोलर कंपनीने केली. पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी पुरवण्याकरीता सौरशक्तीचा वापर करण्याचा संकल्प गावाने सोडला. सहा शेतकऱ्यांचे २२ गट तयार झाले. शासनाच्या अटल सौर कृषीपंप योजनेची मदत या उपक्रमाला मिळाली.

पंचक्रोशीत पोहोचली सौर ऊर्जा 
चैत्राम पवार यांनी स्वतःच्या गावाबरोबरीने आजूबाजूच्या गावांनाही सौर प्रकल्प योजनेत आणण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत ते म्हणाले की, गावामध्ये उद्योग कंपनीच्या सीएसआर फंडातून मोफत सौर प्रकल्प मिळणार होता. गावाने पाच ते दहा अश्वशक्तीची साधने खरेदी करावी, असा सल्ला आम्हाला दिला होता. मात्र, आम्ही त्याला नकार दिला. मोठ्या मोटारी वापरल्या तर शेतीसाठी खूप पाणी उपसले जाईल, पाणी साठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आम्ही २ ते ३ अश्वशक्तीच्या मोटारींची निवड केली. बारीपाड्यात पहिल्या टप्प्यात सौरशक्ती चळवळीतून शेतीसाठी ११ युनिट तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन सोलर युनिट उभारले गेले. याचबरोबरीने मापलगाव, तावरीपाडा, मोहगाव, कालदरमध्ये सोलर युनिट बसविण्यात आले. शेतकऱ्यांच्या शिवारात वीज पुरवठा नसतानाही भरपूर पाणी मिळू लागले. गावपरिसरात ट्रॉलीवरील फिरते सोलर युनिट कार्यरत आहे. या युनिटला ट्रॅक्टर जोडून कोणत्याही शेतात नेले की बिनाविजेचा पाणी उपसा होतो. ५०० रुपये भाडे देवून ही ट्रॉली शेतकऱ्यांना वापरता येते.
 

संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम

  • जंगल,जल,जमीन, जन आणि जनावरे या संकल्पनेवर गावाचे काम.यासाठी पहिल्यापासून देवगिरी कल्याण आश्रमाचे सहकार्य.
  • तीन गावांमध्ये केंद्र सरकारची वनधन योजना. शासनाने सहा महिन्यांसाठी बिनव्याजी पाच लाखाचे भांडवल वनधन विकास केंद्राला दिले. त्यातून वनोपजांचे उत्पादन ते विपणन अशी साखळी गावकरी तयार करत आहेत. 
  • बारीपाड्याच्या परिसरात ११० प्रकारच्या वनभाज्या सापडतात. या गावाने राज्यात सर्वप्रथम २००३ मध्ये वनभाजी स्पर्धा उपक्रम सुरू केला. तीच संकल्पना आता कृषी विभागाने स्वीकारली आहे. 
  • लूपीन कंपनीच्या सीएसआर फंडातून देशबंधू ॲग्रो रिसर्च ॲण्ड प्रोड्यूसर कंपनीची सुरवात. ४५ पाडयांमधील १,०१६ शेतकरी कंपनीचे सभासद. शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक असा उपक्रम. सध्या इंद्रायणी तांदूळ विक्री. यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. येत्या काळात राइस मिल प्रकल्प उभारण्याचा निर्णय.
  • गावकऱ्यांनी शासकीय मदत न घेता श्रमदानातून ४८२ दगडी बांध बांधले.  यातून पाण्याचे साठे आणि जंगल वाढू लागले. शेती,जनावरांना पाणी उपलब्ध झाले. 
  • गावामध्ये आरोग्य समिती, वन व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती. झाड तोडल्यास एक हजार रुपये दंड. राखीव जंगलात बैलगाडी नेल्यास ७५१ रुपये दंड. इंधनासाठी एलपीजी सिलेंडर जोडण्या, सौर ऊर्जावापरावर भर.
  • जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पीक व्यवस्थापनाबाबत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार. वन खाते, कृषी खात्याची गावकऱ्यांना मदत.
  • गावाला देशपातळीवर जैवविविधता पुरस्कार. 
  • राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांचा उल्लेख `रूरल अचिव्हर्स चैत्राम पवार’ असा केला होता. 

- चैत्राम पवार, ९८२३६४२७१३
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...