Agriculture Agricultural News Marathi success story of Bholenath Women self group,Bhenda,Dist.Nagar | Agrowon

महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्ड

सूर्यकांत नेटके
रविवार, 19 जुलै 2020

भेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस महिलांनी एकत्र येऊन सात वर्षापूर्वी जय भोलेनाथ महिला बचत गटाची स्थापना केली. पूरक उद्योग सुरू केले. दोन वर्षांपूर्वी किराणा मॉल सुरू केला. ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्ड नावारूपाला आला आहे.

भेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस महिलांनी एकत्र येऊन सात वर्षापूर्वी जय भोलेनाथ महिला बचत गटाची स्थापना केली. दर महिन्याला आर्थिक बचत करून कुटुंबाला हातभार लावला. पूरक उद्योग सुरू केले. गटाने दोन वर्षांपूर्वी किराणा मॉल सुरू केला. बचत गटाच्या प्रयत्नातून ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्ड नावारूपाला आला आहे.

भेंडा बुद्रूक (जि.नगर)  गावातील सर्वसाधारण कुटुंबातील महिलांनी २०१३ साली एकत्र येऊन अर्चना सुधीर चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेखाली जय भोलेनाथ महिला बचतगटाची स्थापना केली. गटामध्ये दिपाली बाळासाहेब शिंदे (सचिव), योगिता विष्णू मिसाळ, सुनिता शिवाजी फुलारी, लंका बाबासाहेब मिसाळ, सुरेखा बापुसाहेब नजन, स्मिता देवेंद्र काळे, पुष्पा शरद भालेराव, मनिषा यशवंत मिसाळ, शीतल विष्णू फुलारी, संगिता बाबासाहेब गोर्डे, अनिता बाबासाहेब नजन, सविता नानासाहेब मिसाळ, सुवर्णा गोकूळ काळे, भाग्यश्री जाबुवंत फुलारी, जयश्री लक्ष्मण चामुटे, कल्पना संतोष मिसाळ, वैशाली संतोष फुलारी, योगिता छबन शिंदे, सुवर्णा संदीप शिंदे या महिला सहभागी आहेत. सदस्यांकडून सुरुवातीला दर महिन्याला शंभर रुपये त्यानंतर आता दोनशे रुपये बचत केली जाते. बचतीतून जमा झालेल्या रकमेत अंतर्गत महिलांनी आर्थिक व्यवहार केले. नोव्हेंबर, २०१५ मध्ये हा गट महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्राला जोडला. गटाला बॅंकेकडून वेळोवेळी मिळालेल्या कर्जातून महिलांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे.

पूरक व्यवसायाला मिळाली गती 
जय भोलेनाथ महिला बचत गटाला सुरुवातीला बॅंकेकडून दीड लाखांचे कर्ज मिळाले. यातून महिलांनी विविध व्यवसाय सुरू करत घेतलेल्या कर्जाची एका वर्षात पूर्णपणे परतफेड केली. नियमित परतफेड केल्यानंतर पुन्हा साडेतीन लाख रुपयांचे बॅंकेने कर्ज दिले. त्याचीही मुदतीच्या आत दोन वर्षांमध्ये कर्जाची परतफेड केली. गटाला बॅंकेकडून मिळालेल्या पैशातून वैशाली फुलारी, संगिता गोरडे, अर्चना चक्रनारायण, शीतल फुलारी, योगिता शिंदे, मनीषा मिसाळ यांनी शिवणकामाला सुरुवात केली. गिता काळे, योगिता मिसाळ यांनी म्हैसपालन सुरू केले. या शिवाय इतर सदस्यांनी शेती पूरक उद्योगात गुंतवणूक केली. सुनिता मिसाळ यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी गटाच्या पैशाचा हातभार लागला. याशिवाय गटाने पाण्याचा टॅंकर व जनरेटर खरेदी केला असून तो शेतकऱ्यांना मागणीनुसार भाडेतत्त्वावर दिला जातो. त्यातूनही गटाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.

बत्तीस गावांत काम 
नेवासा तालुक्यात महिला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून बचतगट चळवळ उभारली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील ३२ गावांत २६४ महिला बचतगट केलेले असून त्यामध्ये ३,४२८ महिला जोडल्या आहेत.  या गटांसाठी ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र काम पाहत आहे. यातील बहुतांश महिलांनी रोजगार सुरू केलेला आहे, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका समन्वयक मयूर कुलकणी यांनी दिली.

किराणा मॉलची सुरुवात 
जय भोलेनाथ महिला बचत गटातील सदस्यांनी २०१८ मध्ये सामूहिकरीत्या  परिसराची गरज ओळखून नवा वैशिष्टपुर्ण व्यवसाय करण्याचे ठरविले. गटाने किराणा दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भांडवलाचा प्रश्न होता. भांडवलासाठी गटाने बॅंकेकडे कर्ज मागितले. याआधी गटाने घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्याने बॅंकेने गटाला साडे नऊ लाख रुपयांचे कर्ज दिले. याचबरोबरीने गटाकडे स्वबचतीमधील दोन लाख चाळीस हजार रुपये शिल्लक होते. गटातील सदस्यांनी प्रत्येकी वीस हजार रुपयाप्रमाणे शेअर्स जमा करून चार लाख रुपये उभे केले. अशी पंधरा लाख रुपये गुंतवणूक करून गटाने सामूहिक किराणा मॉल सुरू केला.  गेल्या अडीच वर्षापासून यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गटाने एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल असे किराणा सामानाचे कीट तयार केले आहे. हे कीट मॉलमध्ये ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्ड ने उपलब्ध आहे. गटाला विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाची चांगली मदत मिळाली आहे. 

 घरपोच किराणा विक्री 
 बचतगटाने किराणा मॉल सुरू केला. येथे ग्रामस्थ आवश्यक किराणा सामान घेऊन जातात. याच बरोबरीने ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच किराणा पोहोचविण्याची व्यवस्था गटाने केली आहे. यासाठी एका कर्मचारी कार्यरत आहे. घरपोच किराणा पोहोच करण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये शुल्क घेतले जाते. मात्र अकराशे रुपयांपेक्षा अधिक रकमेचा किराणा खरेदी केला तर निःशुल्क घरपोच किराणा पोहोच केला जातो. गटाने किराणा मॉलच्या माध्यमातून अडीच वर्षांत ३० लाख रुपयांची उलाढाल केली. यातून आठ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला. वार्षिक बैठकीत हा नफा सदस्या वाटून घेतात. 

महिला आर्थिक विकास महामंडळाने भेंडे येथील गटाला सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्यामुळे आज हा गट नावारूपाला आला. नगर जिल्ह्यात महामंडळाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोहीम राबवल्याचा फायदा झाला आहे. 
- संजय गर्जे, 
जिल्हा समन्वय, महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर 

आम्ही महिला एकत्र येऊन बचतगट सुरू केला. आता जय भोलेनाथ नावाने किराणा मॉल सुरू केला आहे. बचतगटामुळे महिला आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.’

- अर्चना चक्रनारायण,७४९९७५२७३१, 
(अध्यक्ष, जय भोलेनाथ महिला बचत गट) 
 

- मयूर कुलकर्णी ः ८३२९५१४९५८ 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर महिला
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
महिला शेतकरी कंपनीने दिली शेती, ग्राम...शेती आणि पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी रिहे (...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
काथ्या, काजू प्रक्रिया उद्योगात...कठोर परिश्रम आणि संकटांना ताकदीने तोंड देत इळये (...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...