Agriculture Agricultural News Marathi success story of Chandrshekar Zurkale,Shirsoli,Dist.Jalgaon | Agrowon

रहिवासी सोसायट्यांमध्ये आठ टन कांद्याची विक्री 

चंद्रकांत जाधव 
रविवार, 17 मे 2020

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली बाजारपेठ, पडलेले दर अशा स्थितीतही शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील चंद्रशेखर मुरलीधर झुरकाळे यांनी जळगाव शहरात आठ टन कांद्याची थेट ग्राहकांना विक्री केली. जेथे व्यापारी किलोस ६ रुपये दर देत नव्हते, अशा काळात झुरकाळे यांनी प्रति किलोस १५ रुपये दर मिळवत आर्थिक नुकसान टाळण्यात यश मिळविले. 

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली बाजारपेठ, पडलेले दर अशा स्थितीतही शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील चंद्रशेखर मुरलीधर झुरकाळे यांनी जळगाव शहरात आठ टन कांद्याची थेट ग्राहकांना विक्री केली. जेथे व्यापारी किलोस ६ रुपये दर देत नव्हते, अशा काळात झुरकाळे यांनी प्रति किलोस १५ रुपये दर मिळवत आर्थिक नुकसान टाळण्यात यश मिळविले. 

चंद्रशेखर झुरकाळे यांची सात एकर शेती आहे. रब्बीमध्ये सव्वा दोन एकरातील २४ टन कांदा विक्रीस तयार होता. परंतु कोरोनामुळे बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाले होते. सातत्याने कांद्याचे दर उतरत होते. उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले. कांदा विक्रीसाठी झुरकाळे यांनी मित्र, कृषी विभागातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. आत्मा मधील सोनू कापसे, कृषी सहायक कमलेश पवार, भारत पाटील यांनी कांद्याची गुणवत्ता लक्षात घेऊन जळगाव शहरात ग्राहकांना थेट विक्री सल्ला आणि विक्री परवाना मिळवून दिला. 

थेट विक्रीमुळे नफ्यात वाढ 
शहरातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन झुरकाळे यांनी २० किलो गोणीमध्ये कांदा पॅकिंग केले. दर्जेदार कांदा असल्याने ग्राहकांनी पसंती दिली. एप्रिल महिन्यात जळगाव शहरातील पिंप्राळा, खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंप परिसर, रामानंदनगर, लक्ष्मीनगर, मु.जे.महाविद्यालय परिसर आदी भागातील नाके, निवासी सोसायटीमध्ये जाऊन कांद्याची विक्री सुरू केली. व्हॉट्‌स ॲप आणि कृषी विभागाच्या मदतीने ग्राहकांकडून कांद्याची मागणी नोंदवून थेट विक्री सुरू झाली. पहिल्या पंधरा दिवसात प्रति किलोस २० रुपये आणि नंतरच्या आठ दिवसात १५ रुपये दर मिळाला. झुरकाळे हे कीर्तनकार असल्याने ग्राहकांशी चांगला संवाद साधत कांदा विक्री वाढविली. शिरसोली गाव जळगाव शहरापासून जवळ असल्याने मिनी ट्रॅक्टर वाहतुकीची फारशी अडचण आली नाही. 

सव्वा दोन एकरातील कांदा व्यवस्थापनासाठी झुरकाळे यांना ६२ हजार रुपये खर्च आला. त्यांना एकूण २४ टन कांदा उत्पादन मिळाले. यातील आठ टन कांद्याची जळगाव शहरात थेट ग्राहकांना विक्री केली. उर्वरित १६ टन कांदा शेतामध्येच दहा रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्याला विक्री केली. जेथे उत्पादन खर्च निघणे शक्य नव्हते, तेथे खर्च वजा जाता दीड लाखांचा निव्वळ नफा झुरकाळे यांनी मिळविला. 
-  चंद्रशेखर झुरकाळे, ९११२८२२७११ 


इतर यशोगाथा
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
मका उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रावर भर  यंदा पंधरा एकर क्षेत्रावर मका लागवडीचे...
`कोरडवाहू` प्रकल्पातून मिळाली शेती,...सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र...
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
बियाणे बदल, संतुलित खत व्यवस्थापनातून...खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या...