Agriculture Agricultural News Marathi success story of Dr. Vijay Mahisne,Akola | Agrowon

फळबागेतून शेती झाली फायद्याची..

गोपाल हागे
रविवार, 16 मे 2021

उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. विजय वासुदेव म्हैसणे यांनी शेतीच्या आवडीतून फळबाग फुलविली. फळांच्या थेट विक्रीवर भर देत शेती किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. विजय वासुदेव म्हैसणे यांनी शेतीच्या आवडीतून फळबाग फुलविली. फळांच्या थेट विक्रीवर भर देत शेती किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान प्रसार आणि सक्षम शेतीमाल विक्री व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उरळ बुद्रुक (जि.अकोला) येथील शिवशंकर कनिष्‍ठ महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. विजय वासुदेव म्हैसणे यांनी शेतीच्या आवडीतून गेल्या दहा वर्षात विविध फळपिकांच्या लागवडीतून शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. या शेत शिवाराचे त्यांनी ‘सृष्टी ॲग्रिकल्चर फार्म’ असे नाव ठेवले आहे. विजय म्हैसणे यांचे पाच भाऊ व चार बहिणींचे कुटुंब. वडिलांचे १९७२ मध्ये निधन झाल्यानंतर आईने अतिशय कष्टाने सर्वांना चांगले शिक्षण दिले. विजय म्हैसणे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. परंतु नोकरी निमित्ताने ते अकोला येथे स्थायिक झाले. त्यांची पत्नी सौ. संगीता या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहेत. अतिशय काटकसरीने जीवन जगत त्यांनी शेतीच्या आवडीतून कापशी तलाव येथे गेल्या १३ वर्षांत टप्याटप्याने पंधरा एकर शेत जमीन विकत घेतली. सुटीच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत या शेतात ते स्वतः काम करतात. दैनंदिन शेती कामासाठी तीन मजूर कुटुंब कार्यरत आहेत.  शेतीमध्ये दोन कूपनलिका आणि एक विहीर आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र बागायती झाले आहे. संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन केले आहे.

फळबाग लागवडीला प्राधान्य
डॉ. विजय म्हैसणे हे सुरुवातीला पारंपरिक पिकांची लागवड करत होते. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांनी सूर्यफूल, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तुरीचे चांगले उत्पादनही घेतले. नोकरी करत शेती नियोजन सोपे जावे यासाठी २००९ पासून त्यांनी मिश्र फळबाग लागवडीला सुरवात केली. विविध हंगामात फळ उत्पादन मिळेल यादृष्टीने पपई, पेरू,सीताफळ, आंबा, नारळ, चिकू या पिकांची निवड केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पहिल्या टप्यात पपई लागवड केली. २०१२ पर्यंत पपईचे दर्जेदार उत्पादनही घेतले. हळूहळू उपलब्ध क्षेत्रानुसार दरवर्षी त्यांनी विविध फळपिकांच्या लागवडीस सुरुवात केली. लागवडी अगोदर त्यांनी परिसरातील विविध फळबागांना भेटी दिल्या. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा केली. त्यांचे अनुभव लक्षात घेऊन स्वतःच्या शेतामध्ये फळबाग करण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात 
परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचावे तसेच शेतमाल विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी म्हैसणे यांनी पुढाकार घेऊन डिसेंबर, २०२० मध्ये शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून शेतीमालावर प्रक्रिया करणे, शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि प्रशिक्षण देणे हा उद्देश आहे. आतापर्यंत त्यांनी राज्यातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यास दौरा केला. तसेच गरजेनुसार फळबाग व्यवस्थापन तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देखील पूर्ण केले. कंपनीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान प्रसारावर त्यांनी भर दिला आहे.

जीवामृत,गांडूळ खत निर्मिती
मागील दहा वर्षांत म्हैसणे यांनी जमिनीची सुपीकता जपण्यासाठी तसेच फळांच्या दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविला आहे. यासाठी शेतातील गोठ्यामध्ये चार गीर गाईंचे संगोपन केले आहे. शेण,गोमूत्रापासून जीवामृत, दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खताची निर्मिती केली जाते. याचा पीक वाढीसाठी चांगला फायदा दिसून आला आहे.  

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर
फळबागेत सध्या कोणती कामे सुरू आहेत, किती मजूर काम करीत आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रातील दैनंदिन कामाची घडामोड कळावी या उद्देशाने संपूर्ण शेतामध्ये म्हैसणे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.  मोबाईलद्वारे या कॅमेऱ्याचे नियंत्रण करता येते.  

केसर, बदामी आंबा

 • दोन एकरामध्ये २० बाय २० फूट अंतरावर केसर, बदामी आंबा लागवड.
 • योग्य पीक व्यवस्थापन. सेंद्रिय खते आणि कीडनाशकांचा वापर.
 • दर्जेदार फळांच्या उत्पादनावर भर. 

चिकू

 • दोन एकरांवर १५ बाय १८  फूट अंतरावर लागवड. क्रिकेट बॉल, कालीपत्ती या जातींची निवड. 
 •  यंदापासून फळांच्या उत्पादनाला चांगली सुरुवात.

सीताफळ

 •  दोन एकर बाळानगर, एनएमके- १ गोल्डन या जातींची लागवड.
 •  आठ बाय आठ फुटांवर लागवडीचे नियोजन.
 •  सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन.

पेरू 

 •  २०१४ मध्ये १५ बाय १५ फूट अंतरावर लागवड.
 •  सरदार जातीची निवड.
 •  पेरूपासूनही चांगल्या उत्पादनाला सुरवात.

  कागदी लिंबू 

 • अडीच एकरामध्ये १२ बाय १५ फूट अंतरावर लागवड.शेतकरी २० बाय २० अंतरावर लागवड करतात. परंतु अंतर कमी केल्याने झाडांची संख्या अधिक, फळ उत्पादनवाढीस फायदा.

शेती बांधावर नारळ, साग

 •  संपूर्ण शेती बांधावर २८०० साग आणि १२० नारळ झाडांची लागवड.
 •  नारळ, सागाची चांगली वाढ. नारळ उत्पादनाला सुरवात.

थेट विक्रीवर भर
बागेत तयार झालेल्या फळांची प्रतवारी करून म्हैसणे स्वतः बाजारपेठेत विकण्यासाठी घेऊन जातात. विक्री करताना अनेक अडचणी येतात. व्यापारीसुद्धा कमी दराने मागणी करतात. परंतु सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत असल्याने म्हैसणे हे व्यापारी, ग्राहकांना फळांचा दर्जा, चव याची माहिती पटवून देतात. सध्या पेरू, लिंबू, नारळाची विक्री खात्रीशीर व्यापाऱ्यांना केली जाते. 
मागील दोन हंगामांपासून कोरोना संसर्गामुळे बाजारपेठांमधील व्यवहारांवर निर्बंध आले. याला संधी मानत विजय म्हैसणे यांनी अकोला शहरात स्वतःच थेट ग्राहकांना फळांची विक्री सुरू केली. पपई, नारळ, आंबा, सीताफळाची प्रतवारी करून शासनाचे सर्व नियम पाळत फळे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साखळी उभी केली. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला. सध्या फळांच्या थेट विक्रीसाठी पत्नी सौ. संगीता, मुलगा ऋषिकेश, मुलगी सृष्टी यांची चांगली मदत होते. केसर आंबा एक डझन बॉक्स २५० रुपये आणि बदामी आंबा साठ रुपये किलो दराने थेट ग्राहकांना विक्री होते. नारळ, पपई, आंबा, सीताफळाची थेट विक्री केल्याने नफ्यात वाढ होत गेली. 
    विविध हंगामांत फळांचे उत्पादन होत असल्याने नियोजन आणि विक्री सोपी जाते. २०१८-१९ मध्ये सर्व प्रकारच्या फळांच्या विक्रीतून त्यांना पाच लाख, २०१९-२० मध्ये सात लाख आणि यंदाच्या वर्षी आणखी नफ्यात वाढ होईल, अशी त्यांना आशा आहे. 

- डॉ. विजय म्हैसणे,  ८३७८९८८३८५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
भातशेतीत राज्यात टिकवला क्रमांकसुधारित, संकरित वाणांचा वापर, सुयोग्य...
अल्पभूधारकाला आधार रेशीम शेतीचाअल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीसारखे पूरक...
महिलांना आत्मनिर्भर करणारे समृद्धी कृषी...टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव...
शहर, गाव शिवारांमध्ये ‘निसर्ग’चा जागरनिसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी १८ क्विंटल...उत्कृष्ट व्यवस्थापनातून सोयाबीन बीजोत्पादन शेतीचा...