Agriculture Agricultural News Marathi success story of Krishna Rasal, Ahergav,Dist.Nashik | Agrowon

वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी यांत्रिकीकरण ठरले फायद्याचे

मुकुंद पिंगळे
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे गरजेचे असते. मात्र यासाठी वेळेवर कुशल मनुष्यबळ उपलब्धता अडचणीची ठरू लागली आहे. यावर मात करण्यासाठी आहेरगाव (ता.निफाड,जि.नाशिक) येथील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार कृष्णा शिवाजी रसाळ यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. 

द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे गरजेचे असते. मात्र यासाठी वेळेवर कुशल मनुष्यबळ उपलब्धता अडचणीची ठरू लागली आहे. यावर मात करण्यासाठी आहेरगाव (ता.निफाड,जि.नाशिक) येथील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार कृष्णा शिवाजी रसाळ यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. 

आहेरगाव (ता.निफाड,जि.नाशिक) येथील रसाळ बंधूंची एकूण पाच एकर द्राक्ष बाग आहे. थोरले भगवान, मधले कृष्णा आणि धाकटे अरुण हे तिघे भाऊ. मोठे बंधू नोकरीला असल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी कृष्णा यांच्यावर आहे. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी बारावी नंतर शिक्षण सोडले. गेली १४ वर्षे पूर्ण वेळ द्राक्ष शेतीमध्ये ते रमले आहेत. त्यांच्यासोबत लहान भाऊ अरुण हे द्राक्ष बागायती पाहतात. सुरवातीला द्राक्ष बाग करताना कमी अनुभव, भांडवल आणि कुशल मनुष्यबळाच्या अडचणी होत्या. यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी कालानुरूप यांत्रिकीकरण स्वीकारले. त्यामुळे द्राक्ष शेतीत खर्च व वेळ वाचला. तसेच द्राक्षाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळू लागले.  

दृष्टिक्षेपात द्राक्षशेती 
जातींची लागवड 

 •   धनाका-१ एकर,  
 •   सुपर सोनाका-१ एकर
 •   एसएसएन- २ एकर (सफेद जात)
 •   मामा जम्बो १ एकर (काळी जात)
 •   बहर छाटणी कालावधी ः १ ते २५ ऑक्‍टोबर
 •   एकरी उत्पादन क्षमता ः १२ ते १४  टन
 •   ८० टक्के निर्यात,२० टक्के स्थानिक विक्री

यांत्रिकीकरणाचा योग्य पर्याय 
 सध्याच्या काळात द्राक्ष शेतीमध्ये कुशल मजुरांची उपलब्धता ही मोठी अडचण असल्याने रसाळ बंधूंनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला. त्यामुळे मजूर टोळ्या शोधण्यासाठी होणारी धावपळ कमी झाल्याने नियोजनात सुसूत्रता आली. बदलत्या काळातील शेती करताना यांत्रिकीकरणाचे अनेक फायदे होऊ लागले आहे. यापूर्वी बागेत कीडनाशके फवारताना ते अंगावर पडून बाधा होण्याची शक्यता असे. आता यांत्रिकीकरणाने योग्य फवारणी होते. धोके कमी झाले आहेत. अचूक फवारणीमुळे कीडनाशकातही बचत होऊ लागली आहे.  

यंत्र वापराचे तांत्रिक मुद्दे

 • विद्युत भारयुक्त सूक्ष्मकणांमध्ये फवारणी होत असल्याने रोग, किडींवर वेळेवर नियंत्रण.
 • यंत्र वजनास हलके असल्याने पावसात ट्रॅक्टर न फसता योग्य फवारणी.
 • फवारणीमध्ये परिस्थितीनुरूप बदल करणे शक्य.
 • हायड्रॉलिक यंत्रणा असल्याने फवारणीसाठी सोयीची उंची ठेवण्याची सुविधा.
 • वापरलेले बूम लवचिक असल्याने तार, वेलीस अडकल्यास नुकसान होण्याची जोखीम नाही.
 • फवाऱ्यामधील प्रत्येक नोझल कोणत्याही अंशांमध्ये फिरवून द्राक्ष वेलीच्या कॅनॉपीमध्ये गरजेनुसार वापर.  

काढणीपश्चात जमेच्या बाजू 
द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचे उतरलेले योग्य प्रमाण, मण्यांचा कडकपणा, आकर्षक रंग,चकाकी आणि टिकवणक्षमता या निकषांवर गुणवत्तापूर्ण द्राक्ष घड तयार होतो. त्यामुळे व्यापारी, निर्यातदारांकडून चांगली मागणी असल्याने समाधानकारक दर मिळतात. प्रामुख्याने इंग्लंड, रशिया, बांगलादेशमध्ये निर्यात होते. यंदाच्या वर्षी गुणवत्तेमुळे प्रति किलो ९७ रुपयांचा दर मिळाला. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी पुरवठा साखळी अडचणीत असताना शिल्लक  द्राक्षाला गुणवत्तेमुळे किरकोळ विक्रीमध्ये सरासरी प्रति किलोस ३० रुपयांचा दर मिळाला.

सिंचन प्रणालीतील बदलाचे फायदे

 • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि बचत.
 • योग्य प्रमाणामध्येच खतांचा वापर.
 • वाफसा अवस्थेत गरजेनुसार सिंचन.

द्राक्ष हंगामाचे व्यवस्थापन

 • पानदेठ, काडी परीक्षण, त्यानुसार खतांचा पुरवठा.
 • सूक्ष्म सिंचनाचा अधिक वापर.
 • गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सातत्याने तांत्रिक निरीक्षणे.
 • हवामानासंबंधी अपडेट्स मिळवून त्यानुसार बागेचे नियोजन.

यांत्रिकीकरणावर भर 

 •  बुरशीनाशके, कीटकनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीसाठी अत्याधुनिक फवारणी यंत्रणेचा वापर.
 •  विद्राव्य खते ठिबक सिंचनातून सोडण्यासाठी पिस्टन डिझेल पंप.
 • आंतर मशागतीसाठी रोटाव्हेटर.
 •  डिपिंग व फवारणीसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर पंप. 

आधुनिक फवारणी यंत्रामुळे चांगले कव्हरेज 
गोड बहर छाटणीनंतर हंगामातील कामे वेळेत करणे अपेक्षित असते. त्यामध्ये घडाचे डिपिंग करण्यासाठी कुशल मजूर लागतात. मात्र हे काम वेळेत होत नाही. मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरमुळे ही कामे वेळेत होऊ लागली, तसेच खर्चामध्ये बचत झाली. डिपिंगचे काम अचूक व गुणवत्तापूर्ण होऊ लागल्याने द्राक्ष उत्पादनात चांगले परिणाम मिळू लागले.  

असे झाले बदल 

 •   परंपरागत पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी.
 •   पूर्ण आणि एकसमान फवारणी शक्य.
 •   इतर पद्धतीपेक्षा रसायन, पाण्याचा कमी वापर.
 •   यंत्रामधून योग्य पद्धतीने फवारा बाहेर पडल्यानंतर  घडांवर योग्य प्रकारे थेंब जातात.
 •   १०० टक्के कव्हरेज, कॅनोपीमध्ये खोलपर्यंत थेंब पोहोचतात.
 •   द्रावणाचा योग्य वापर, पारंपारिक पद्धतीपेक्षा दर्जेदार डिपिंग.
 •   डिपिंगमध्ये द्राक्ष घड भिजून आवश्यक रसायने, संजीवकांची एकसारखी मात्रा.

फवारणीच्या तांत्रिक बाजू 
डिपिंग करण्यापूर्वी हवेचा वेग, तापमान, आर्द्रता यांचा अंदाज घेऊन यंत्रांच्या माध्यमातून फवारणी केली जाते. यंत्राद्वारे बुरशीनाशकांची फवारणी करताना  तीव्रता व विद्युतभार यांची माहिती यंत्राच्या अनालॉग मीटरवर कळते.  फवारणीसंबधी अचूक आढावा घेता येतो. घडनिर्मिती झाल्यानंतर किमान ३ वेळा डिपिंग करता येते.
डिपिंगचे नियोजन  

 •  अवस्था     कालावधी
 • कळी अवस्था    २५ ते २८ दिवस
 • मणीधारणा    ५५ ते ६० 
 • विरळणी पश्चात    ७० ते ८०

डिपिंगनंतर झालेले  फायदे 

 •   फवारणी सर्व ठिकाणी सारखी होत असल्याने पानांचा हिरवेपणा कायम.
 •   द्राक्ष घड, मण्यांचा एकसारखा आकार.
 •   घडनिर्मितीनंतर मणी देठ मजबूत.
 •   गुणवत्तापूर्ण मण्यांची फुगवण होऊन आकार, चकाकी आणि अपेक्षित गोडी.
   

कार्यक्षमता, गुणवत्तेमध्ये चांगली वाढ

 • पूर्वी मजुरांकडून संजीवकांचे डिपिंग करताना घड कमी-जास्त तसेच अर्धवट बुडविला जाण्याची शक्यता असायची. त्यामुळे उत्पादनात अडचणी येत होत्या. मात्र आधुनिक फवारणी यंत्राच्या साहाय्याने कामे दर्जेदार होऊ लागल्याने गुणवत्तेत ३० ते ४० टक्क्यापर्यंत वाढ.
 •  फवारणी यंत्राचा वापर करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून हवामान, पावसाची परिस्थिती पाहून योग्य बुरशीनाशकांची निवड आणि वापर. 
 •  ऑक्टोबरच्या सुरवातीपासून गोड्या छाटणीचे टप्प्याटप्प्याने नियोजन. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रोगांचा धोका, फवारण्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी. 
 • दिवसभरामध्ये किमान वेळेत अधिक क्षेत्रावर फवारणी. इंधन, मजुरीमध्ये बचत.
 • डिपिंगसह विरळणी होत असल्याने घडातील अतिरिक्त मणीगळ करणे शक्य.
 • घडांवर डाग पडत नाहीत, त्यामुळे दर्जेदार घड निर्मिती.

  यंत्र भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय 

फवारणी यंत्राची किंमत लाखांत असल्याने कमी द्राक्ष लागवड असलेल्या शेतकऱ्यांना ही यंत्रणा खरेदी करणे आर्थिकदृष्टया परवडत नाही. ही गरज लक्षात घेऊन रसाळ बंधूंनी  भाडेतत्वावर फवारणी यंत्र देण्याच्या व्यवसाय सुरू केला.   मनुष्यबळाच्या तुलनेत यांत्रिक फवारणीचे दर कमी असल्याने परिसरातील द्राक्ष बागायतदार त्यांच्याकडे मागणी करतात. एक वेळ डीपिंगसाठी प्रति एकरी १८०० रुपये दर आकारला जातो. फवारणीचे चांगले परिणाम होत असल्याने लहान क्षेत्र असलेल्या बागायतदारांच्याकडून यंत्रणांना मागणी वाढलेली आहे. 

अभ्यासू शेतकऱ्यांच्या बागेला भेटी 
कृष्णा रसाळ हे देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी नेहमी संपर्कात असतात. याचबरोबरीने  सांगली, सोलापूर  जिल्ह्यातून त्यांच्या द्राक्षशेतीस आवर्जून भेट देण्यासाठी बागायतदार येत असतात.

- कृष्णा रसाळ, ९४०४५६९१९६

 

 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...
‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...
अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...
कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...
यांत्रिकीकरणातून होताहेत आदिवासी आर्थिक...पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यांतील...
पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलतापारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला)...
शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली...पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील...
शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशीलजळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले...
महिला बचत गटांची दुग्धव्यवसायात भरारीखडकूत गावातील बचतगटांना महिला आर्थिक ...
शेतीला मिळाली शेळीपालनाची साथशिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथील पंकज...