अडीच एकरातील स्वीटकॉर्नची थेट विक्री 

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी दर पाडले. घसरलेल्या दरामुळे अडीच एकरातील स्वीट कॉर्नचा उत्पादन खर्चही हाती येत नव्हता. अशा स्थितीत व्यथित न होता कुमार कुलकर्णी यांनी अडीच एकरातील स्वीट कॉर्न थेट ग्राहकांना विकत चांगला मोबदला मिळविला आहे. थेट मार्केटिंगचा कोणताच अनुभव नसताना गेल्या पंधरा दिवसात सुमारे ऐंशी हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.
sweet corn packing
sweet corn packing

 लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी दर पाडले. घसरलेल्या दरामुळे अडीच एकरातील स्वीट कॉर्नचा उत्पादन खर्चही हाती येत नव्हता. अशा स्थितीत व्यथित न होता कुमार कुलकर्णी यांनी अडीच एकरातील स्वीट कॉर्न थेट ग्राहकांना विकत चांगला मोबदला मिळविला आहे. थेट मार्केटिंगचा कोणताच अनुभव नसताना गेल्या पंधरा दिवसात सुमारे ऐंशी हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे. 

कुमार कुलकर्णी हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांची तांदूळवाडी (जि. सांगली) येथे शेती आहे. या शेतीत ते विविध पिके घेत असतात. यंदाच्या फेब्रुवारीत त्यांनी स्वीट कॉर्नची लागवड केली. परंतू ऐन काढणीच्या वेळीच लॉकडाऊन आणि बाजारपेठा बंद असल्याची स्थिती उद्भवली. त्यांनी कोपार्डे येथील एका व्यापाऱ्याकडे चौकशी केली. त्यांनी अगदी नाममात्र किंमतीत स्वीट कॉर्नची उचल करण्याची तयारी दर्शवली. आत्तापर्यंत झालेला खर्च आणि मिळणारी किंमत याचा हिशेब केल्यास पूर्णपणे तोट्यात विक्री करावी लागली असती. कुमार कुलकर्णी स्वतः कृषी विषयाचे पदवीधर आहेत. त्यांचा मुलगा वैद्यकीय व्यावसायिक आहेत. कुलकर्णी कुटुंबियांना शेतीमाल विक्रीचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही तोट्यात स्वीट कॉर्न विकण्याऐवजी स्वतः विक्रीचे काही प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरवले. थेट ग्राहकांना स्वीटकॉर्न विकल्यास निदान तोटा तरी होणार नाही, असे कुलकर्णी यांना वाटले. संपूर्ण कुटुंब स्वीट कॉर्न काढणी व त्यानंतर पॅकींगसाठी राबू लागले. सकाळी सहा ते अकरा पर्यंत एकत्र बसून त्यांनी पोत्यामध्ये स्वीट कॉर्नची कणसे भरली. शेतीतील इतर सहकाऱ्यांची मदत वाहतुकीसाठी मिळाली. 

थेट विक्रीमुळे ५० हजार रुपये फायदा  

स्वीट कॉर्नची सुमारे १३,५०० कणसे त्यांनी ८ रुपये किलो या दराने कोल्हापूर येथील बाजारात नेवून विकली. काही कणसे अगदी नाममात्र दराने स्वयंसेवी संस्थेला दिली. अशा प्रकारे त्यांना अडीच एकरातून ६० हजार रुपये मिळाले. वैरणीचे २० हजार असे एकूण सुमारे ऐंशी हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना स्वीट कॉर्नमधून मिळाले. व्यापाऱ्याला कणसे विकली असती तर केवळ ३० हजार रुपये मिळाले असते. या काळात लॉकडाऊनच्या काळात थोडेसे जादा प्रयत्न केल्यामुळे त्यांना ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य झाले. आजवर केवळ व्यापाऱ्यांवर अवलंबून राहिल्यामुळे आपला किती तोटा होत होता, याचा अनुभव या अडचणीच्या स्थितीत आला. भविष्यातही अशाच प्रकारे विक्रीचे स्वतः नियोजन करण्याचा मनोदय कुमार कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 

- कुमार कुलकर्णी, ९४२११०६७३५ ७३८५८५८९६९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com