घरपोच भाजीपाला, फळांची विक्री

करार शेतीच्या माध्यमातून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्याचा प्रयत्न लॉकडाऊनमुळे फसला.अनपेक्षितपणे आलेल्या संकटाला तोंड देत अचलपूर (परतवाडा) येथील नरेंद्र राऊत यांनी घरपोच भाजीपाला आणि फळांची विक्री सुरू करुन नुकसान कमी करण्याचा केलेला प्रयत्न दखल पात्र आहे.
Tomato harvesting
Tomato harvesting

 करार शेतीच्या माध्यमातून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्याचा प्रयत्न लॉकडाऊनमुळे फसला.अनपेक्षितपणे आलेल्या संकटाला तोंड देत अचलपूर (परतवाडा) येथील नरेंद्र राऊत यांनी घरपोच भाजीपाला आणि फळांची विक्री सुरू करुन नुकसान कमी करण्याचा केलेला प्रयत्न दखल पात्र आहे.    अचलपूर येथील नरेंद्र राऊत यांची आठ एकर शेती. त्यामध्ये पाच एकरावर फुलशेती आहे. यावेळी त्यांनी वेगळी वाट म्हणून भाजीपाला आणि कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी रुपेश उल्हे यांच्यासोबत भागीदारी केली. दोघांनी मिळून परिसरातील तीन गावांच्यामध्ये तब्बल २५ एकर क्षेत्र प्रती एकर १५ हजार रुपयांप्रमाणे वर्षभराकरीता भाडेतत्वावर घेतले. या संपूर्ण शिवारात वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, भेंडी आणि साडे तेरा एकरावर कलिंगडाची लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून पीक काढणीस आले. या सर्व क्षेत्रातून किमान १५ लाख रुपयांची उलाढाल होईल, अशी अपेक्षा असतानाच अनपेक्षितपणे लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री व्यवहारावर मर्यादा आल्या. आर्थिक नाकाबंदीमुळे नरेंद्र राऊत जेरीस आले. व्यापाऱ्यांनी २ ते ३ रुपये प्रति किलो दराने टोमॅटो आणि चार रुपये किलोने कलिंगडाची मागणी केली. हे मोठे आर्थिक नुकसान सोसण्यापेक्षा नरेंद्र राऊत यांनी अचलपूर शहरात घरपोच भाजीपाला,फळे देण्याचा निर्णय घेतला. यामागे आर्थिक नुकसानाची टक्‍केवारी कमी करणे हा एकमेव उद्देश होता.  

केबलवाहिनीवरून केली जाहिरात   नरेंद्र राऊत यांनी घरपोच भाजीपाला, फळांच्या विक्रीची जाहिरात स्थानिक केबल वाहिनीवरून केली. अचलपूरसारख्या गावात हा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे याला प्रतिसाद कसा आणि किती मिळेल, याबाबत खुद्द नरेंद्र राऊत आणि रुपेश उल्हे साशंक होते. पहिल्या दिवशी अवघ्या दोन ग्राहकांकडूनच उत्सुकतेपोटी भाजीपाल्याची मागणी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्राहकांची संख्या सातवर पोचली. केबल वाहिनीसोबतच परिसरातील विविध शेतकरी व्हॉटसॲप गृपवरुन प्रचार करण्यात आला. अनेकांनी उपक्रमाचे कौतुक केले. अशाप्रकारे रोज ग्राहकांकडून भाजीपाला, फळांची मागणी वाढीस लागली.

प्रतवारीकरूनच भाजीपाला विक्री      सध्या दररोज सरासरी २० ते २५ ग्राहक भाजीपाला, फळांची मागणी नोंदवितात. विशेषतः डॉक्‍टर, वकील, शिक्षक कुटुंबाकडून या उपक्रमाला चांगला प्रसिसाद मिळतो आहे. ग्राहकांना भाजीपाल्याचे दर व्हॉटसअप वरून कळविले जातात. त्यानुसार ग्राहक मागणी नोंदवितात. सरासरी ३०० रुपयांची मागणी व्हॉटसअपच्या माध्यमातून नोंदविल्यास ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांचा पुरवठा केला जातो.   परिसरातील शेतकऱ्यांकडून पालक, लिंबू, बटाटा खरेदी केली जाते. त्यामुळे गावशिवारातील इतर शेतकऱ्यांनादेखील चार पैसे मिळण्यास मदत होत आहे. नुकसानीची पूर्णपणे नाही, परंतू बऱ्याच अंशी नुकसान भरपाई करण्याचा राऊत यांचा प्रयत्न सुरू आहे.

ठराविक वेळेतच होतो पुरवठा सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळात घरपोच भाजीपाला पोचविला जातो. यासाठी तीन युवकांना रोजगार मिळाला आहे. या मुलांना दररोज २०० रुपये मजुरी, दुचाकी आणि त्यामध्ये पेट्रोल भरुन दिले जाते.  प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करूनच भाजीपाला पोहोचविला जातो.

- नरेंद्र राऊत,७०२०२४३१६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com