Agriculture Agricultural News Marathi success story of Nature group,Solapur | Agrowon

निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी’ उपक्रम

सुदर्शन सुतार
रविवार, 1 ऑगस्ट 2021

सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स, उद्योजक आणि निसर्गप्रेमी यांना एकत्र आणत  निसर्ग संवर्धनासाठी डॉ. यशवंत पेठकर आणि डॉ. सचिन पुराणिक यांनी ‘झाडांची भिशी’ हा अनोखा उपक्रम सुरु केला.

सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स, उद्योजक आणि निसर्गप्रेमी यांना एकत्र आणत  निसर्ग संवर्धनासाठी डॉ. यशवंत पेठकर आणि डॉ. सचिन पुराणिक यांनी ‘झाडांची भिशी’ हा अनोखा उपक्रम सुरु केला. याचबरोबरीने पर्यावरणपूरक उपक्रम, आरोग्यसेवेतही हा गट चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.

सोलापूर शहरात वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेले डॉ. यशवंत पेठकर आणि डॉ. सचिन पुराणिक हे निसर्गप्रेमी. साधारण आठ वर्षापूर्वी त्यांना वृक्षलागवडीची संकल्पना सुचली आणि वेळ न दवडता, त्यांनी वृक्ष लागवडीला सुरुवात केली. वृक्षमित्र सुभेदार बाबूराव पेठकर आणि पक्षीमित्र, निसर्गप्रेमी प्रा. सिद्रामप्पा पुराणिक यांचा वारसा लाभलेली ही व्यक्तिमत्त्व. त्यांच्याच प्रेरणेने निसर्ग संवर्धनाचा त्यांचा उत्साह वाढला. डॉ. पेठकर आणि डॉ. पुराणिक यांनी स्वखर्चातून आपल्या परिसरात, शहरातील कॉलनीमध्ये रोपाच्या लागवडीस सुरुवात केली. यामध्ये  अनेक जण सामील होत गेले. आज या निसर्गप्रेमी गटाला ‘झाडांची भिशी’ या नावाने ओळख मिळाली आहे. या निसर्ग प्रेमींपासून प्रेरणा घेऊन पिंपरी- चिंचवड, जळगाव आणि औरंगाबादमध्येही असे गट तयार झाले आहेत.

...अशी सुचली संकल्पना
डॉ. पेठकर आणि डॉ. पुराणिक यांनी स्वखर्चातून रोपलागवडीच्या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या डॉक्टर मित्रांना या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर एकेक सदस्य जोडला गेला. त्यातूनच ‘झाडांची भिशी’ संकल्पना पुढे आली. त्यानुसार प्रत्येक सदस्याने दरमहा ठरावीक रक्कम जमा करून गटामधील एका सदस्याच्या नावे चिठ्ठी काढली जाते. जमा झालेल्या रकमेतून रोपे आणि ट्रीगार्ड खरेदी केले जातात. निवड झालेल्या सदस्याच्या इच्छेनुसार रोपे लागवडीचा उपक्रम होतो. सुरुवातीला या गटामध्ये केवळ २० सदस्य होते, आता ही संख्या ९५ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये व्यावसायिक, नोकरदार आणि डॉक्टरांचा समावेश आहे.

महिन्यातून एका रविवारी भेट 
‘झाडांची भिशी’ गटामधील सर्व जण आपापल्या व्यवसायात पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे वेळेचे नियोजन काटेकोर असते. परंतु महिन्यातील एखाद्या रविवारी हमखास वेळ काढून सर्वजण एकत्र जमतात. त्यामध्ये प्रति महिना प्रति सदस्य ३०० रुपये जमा केले जातात. तसेच झाडांची भिशी काढली जाते. त्यानंतर सदस्यांच्या इच्छेनुसार संबंधित ठिकाणी रोपे लावली जातात. एखादवेळेस काही अडचण आलीच, तर या सर्वांचा व्हॉट्‌सअॅप ग्रुप आहे. त्यावर चर्चा होऊन निर्णय होतो. पण ठरलेल्या उपक्रमात खंड पडत नाही. 

योग्य झाडांची निवड   
गटातर्फे प्रामुख्याने वड, लिंब, उंबर, चिंच, पिंपळ, बकुळ, करंज, रेन ट्री, गुलमोहर, नीलमोहर, भोंडर, पांगरा, अर्जुन, कांचनार, अंजन, सप्तपर्णी, जांभूळ, कडुनिंब, काशीद, बेल, सावर, काटेसावर, कवठ, पिंपरान, आवळा, बेहडा या झाडांना प्राधान्य दिले जाते. लागवडीसाठी किमान सहा फूट उंचीच्या रोपांची लागवड केली जाते. 
रोप लागवडीच्या सोबत संरक्षणासाठी ट्रीगार्ड लावले जातात. रोपाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित सदस्य घेतो. एखादी सोसायटी, शाळा, संस्थेच्या परिसरात रोपे लावायची असतील, तर त्याच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित लोक घेणार आहेत का, हे आधी विचारले जाते, मगच त्या ठिकाणी रोप लावण्याचा निर्णय होतो. गटाच्या माध्यमातून आतापर्यंत शहर आणि परिसरातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, मैदान, कॉलनी, रस्ते आदी परिसरात सुमारे १५०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. आजही मोहीम सुरुच आहे. लागवड केलेल्या रोपांपैकी ८० टक्के आता सावली देण्याएवढी मोठी झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी सोलापुरात भरवण्यात आलेल्या वसुंधरा महोत्सवात ‘झाडांची भिशी’ गटाचा ‘वसुंधरा मित्र पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. याशिवाय रोटरी क्लबसह अन्य स्वयंसेवी संस्थांनीही गटाच्या कामगिरीची दखल घेत सन्मान केला आहे.  

रोपाचा वाढदिवस 
रोप लागवड झाल्यानंतर महिन्यातून दोन वेळेस त्याची पाहणी केली जाते. त्याची वाढ व्यवस्थित होते का, हे तपासले जाते. समजा एखादे रोपे रुजले नाही, तर तेथे लगेच नवीन रोप लावले जाते. ट्रीगार्ड खराब झाले, तर त्याची दुरुस्ती केली जाते. वर्षपूर्ती केलेल्या रोपाचा केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.

कोरोना काळात मदतीचा हात
‘झाडांची भिशी’ गटामध्ये डॅाक्टरांची संख्या अधिक आहे. याचबरोबरीने ‘सोलापूर रनर असोसिएशन’ नावाचा डॉक्टरांचा एक गट आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या उपक्रमात थोडा अडथळा आला. परंतु त्यावर मात करत उपक्रम सुरू आहे. तसेच कोरोना काळात गरजूंना आरोग्य सेवेबरोबरच अन्नदान उपक्रमही डॉक्टरांच्या गटाने राबवला. 

प्लॅस्टिक ब्रिक्सचा प्रयोग 
सध्या प्लॅस्टिक कचरा ही एक मोठी गंभीर समस्या तयार झाली आहे. त्यासाठी प्लॅस्टिक ब्रिक्सचा प्रयोग राबवण्याचा विचार गटाच्या माध्यमातून करण्यात आला. कचरा म्हणून जाणारा प्लॅस्टिक पेपर, रॅपर, प्लॅस्टिकच्या छोट्या वस्तूंचा वापर करून प्लॅस्टिक ब्रिक्स तयार करण्यात येत आहेत. 

- डॅा. यशवंत पेठकर,  ९५१८९६००२५
- डॅा. सचिन पुराणिक,  ९८२३११५८८५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...