Agriculture Agricultural News Marathi success story of Planet Earth Foundation, Shirala, Dist .Sangli | Page 3 ||| Agrowon

जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागर

आकाश पाटील
रविवार, 30 ऑगस्ट 2020

बत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी एकत्र येऊन निसर्ग संवर्धन आणि समाजोपयोगी संकल्पनांना चालना देण्यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली.

बत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी एकत्र येऊन निसर्ग संवर्धन आणि समाजोपयोगी संकल्पनांना चालना देण्यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली. लोकसहभागातून स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षणाद्वारे सामाजिक प्रबोधन संस्थेतर्फे केले जाते.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा एकमेव तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारखा जैवविविधतेचा ठेवा तालुक्यास लाभला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अधिक वनक्षेत्र व जैवविविधता असलेला हा तालुका आहे. तालुक्यात २०१७ साली युवकांनी एकत्र येऊन निसर्ग संवर्धन व समाजोपयोगी संकल्पनांना चालना देण्यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली. लोकसहभागातून स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन व संशोधन, पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षण, सामाजिक विकास आणि पारंपरिक व शाश्वत जीवनशैलीचे ग्रामीण व शहरी समाजामध्ये प्रबोधन हे संस्थेचे प्रमुख उद्देश आहेत. संस्था गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये अनेक ठिकाणी विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवीत आहे. 

संस्थेच्या उपक्रमात आकाश पाटील (अध्यक्ष), प्रणव महाजन (उपाध्यक्ष), प्रवीण पारसे (सचीव), प्रभाशिनी मोहपात्रा, वैभव नायकवडी, समीर पिरजादे, अनिरुद्ध महाजन, प्रा. सुशीलकुमार गायकवाड, प्रथमेश शिंदे, अक्षय म्हेत्रे, अमित माने, डॉली ओसवाल, प्रणव हसबनीस, प्रवीण शिंदे  यांचा सहभाग आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांना डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, डॉ. शिल्पा कुरणे, दिनेश हसबनीस व मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. संस्थेच्या विविध उपक्रमांना चांदोली वनविभाग, शिराळा वनविभाग, शिराळा नगरपंचायतीचे सहकार्य मिळाले आहे.

जैवविविधता सर्वेक्षण, संशोधन
संस्थेतर्फे बत्तीस शिराळा, इस्लामपूर, कडेगाव, पलूस नगरपंचायत, नगरपरिषद आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळांतर्गत स्थानिक जैवविविधता अभ्यास, संशोधन व लोकसहभागातून पारंपरिक माहितीचे संकलन करण्यात येत आहे. याचबरोबरीने खिरवडे आणि वाकुर्डे(बु) ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लोकसहभागातून वृक्षलागवडीला संस्थेने चालना दिली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामधील जैवविविधता संवर्धनासाठी जंगल, वनस्पती, प्राणी, पक्षांबाबत संशोधन, माहिती संकलन आणि अभ्यास विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

वृक्ष लागवड, देशी झाडांची रोपवाटिका

  • गेल्या पाच वर्षांमध्ये वनविभाग, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि खासगी उद्योजकांच्या सहभागातून संस्थेने दहा हजारांपेक्षा जास्त देशी वृक्षांच्या रोपांची लागवड केली आहे. शिराळा शहरामध्ये एमआयडीसी आणि  स्थानिक संस्थांच्या सोबत उद्यान प्रकल्प सुरु आहेत. 
  • विकास कामामध्ये येणाऱ्या झाडांना वाचवण्यासाठी एजीई-टीव्ही कंपनी सोबत वृक्ष प्रत्यारोपण प्रकल्प राबवण्यात येत आहे. संस्थेने स्थानिक देशी वृक्षांची रोपवाटिका उभारली आहे. या रोपवाटिकेतून निसर्ग प्रेमी आणि नागरिकांना देशी वृक्षांच्या रोपांची उपलब्धता करून दिली जाते. 
  • विविध उपक्रमातून विद्यार्थी, शिक्षक, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, विद्यापीठ आणि नागरिकांना एकत्र करून निसर्ग संवर्धनासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

शालेय विद्यार्थांचा सहभाग 
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पांतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या बफर झोनमधील शाळा तसेच विविध वाडी-वस्त्यांमधील विद्यार्थांसाठी संस्थेच्या माध्यमातून जैवविविधता संवर्धनासाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी निसर्ग अभ्यास शिबिरे व सहलींचे दरवर्षी आयोजन केले जाते. जैवविविधता संवर्धन विषयांतर्गत विविध संस्था, विद्यापीठ, वन विभाग, स्थानिक प्रशासन तसेच निसर्ग प्रेमी, शेतकरी आणि युवा वर्गास निसर्गाशी जोडण्यासाठी विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि संमेलनांचे आयोजन दरवर्षी केले जाते. याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

पदवीधर शिक्षण घेणाऱ्यांसाठी उपक्रम 
संस्थेतर्फे आयएलडीपी या उपक्रमाद्वारे राज्यातील विविध विद्यापीठामध्ये पदवीधर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांसाठी  संशोधन क्षेत्रातील एक व्यासपीठ तयार केले आहे. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी सिद्धी दामले ही पक्षी व त्यांची घरटी, अर्श चौहान हा घन कचरा व वन्यजीव आणि चेतन सोमवंशी(शिक्षक) हे जंगली औषधी, रानभाज्यांबाबत संशोधन करत आहेत. शिवाजी विद्यापीठामधील मनीष महेंद्रकर आणि विशाल पाटील या विद्यार्थ्यांनी सरपटणारे प्राणी विषयामध्ये संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. टाटा संस्थेतील सायली कदम यांनी “शेती विषयी युवा वर्गाचे मत” या विषयासंदर्भात शोध अहवाल तयार केला आहे.

मियावाकी जंगल निर्मिती 
स्थानिक परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन आणि देशी वृक्षांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीने बत्तीस शिराळा येथे  डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या सहकार्याने संस्थेने गेल्यावर्षी  मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्प लोकसहभागातून उभारला. याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. यंदाच्यावर्षी डॉ.दीपक यादव आणि डॉ. मनीषा यादव यांच्या सहकार्याने बत्तीस शिराळा परिसरात दुसरा मियावाकी जंगल प्रकल्प लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात सुमारे २५०० हून अधिक लोकांनी या प्रकल्पाला भेट दिली. अनेकांना यातून प्रेरणा मिळाली असून त्यांनी वृक्षारोपण आणि आपल्या भागातील मोठ्या वृक्षांची काळजी घेणे सुरू केले आहे. समाजामध्ये वृक्ष, जंगल आणि जैवविविधता संवर्धनाबद्दल जागृती निर्माण करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.  

शाल्मली वाचनालय 
पुणे शहरातील बिबबेवाडी भागामध्ये संस्थेच्या सदस्यांनी शहरातील नागरिकांना निसर्ग आणि वाचन संस्कृतीशी जोडण्यासाठी शाल्मली वाचनालयाची सुरुवात केली. या वाचनालयाची संपूर्ण उभारणी प्रभाशिनी मोहपात्रा यांच्या पुढाकारातून झाली. सामाजिक देणगी व आर्थिक सहकार्यातून हे वाचनालय वाढत आहे.अनेक उपक्रमातून विद्यार्थी  आणि नागरिकांना निसर्गाशी जोडण्याचे प्रयत्न संस्थेने केला आहे. या प्रकल्पामध्ये सिद्धी, तनया, अर्श, जुबिना, गौरव, अक्षय, स्नेहल, राहुल या सदस्यांचे चांगले सहकार्य लाभते.  

वन्यजीव आपत्कालीन बचाव सेवा केंद्र 
संस्थेने प्रादेशिक वन विभाग आणि पशुवैद्यकीय केंद्र, शिराळा यांच्यासोबत वन्यजीव आपत्कालीन बचाव केंद्राची उभारणी केली आहे. याचबरोबरीने बिबट्या व मानव सहजीवन प्रकल्पांतर्गत शिराळा, वाळवा तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागासोबत विविध उपक्रमाद्वारे सामाजिक प्रबोधन  केले जाते. यामुळे वन्यजिवांच्या संवर्धनासाठी फायदा होत आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रामधील विविध गावांच्यामध्ये पाळीव प्राणी, वन्यजीव बचाव आणि उपचार सेवा पी.ई.एफ रेस्क्यू टीमद्वारे पुरवली जाते.

 

- आकाश पाटील: ९४२०४४९१११,  

 - प्रणव महाजन: ९६५७४९३१६१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...