Agriculture Agricultural News Marathi success story of Raju Konde,Dhmankhel,Dist.Pune | Agrowon

दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे नियोजन

गणेश कोरे
बुधवार, 20 मे 2020

 डाळिंब फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. सध्या बागेत स्वच्छतेबरोबर सध्या शेणखत आणि  सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन बेडची चाळणी करुन घेण्याचे काम सुरू आहे. झाडाची वाढ आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊनच खतमात्रेचे नियोजन केले आहे.

डाळिंब फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. सध्या बागेत स्वच्छतेबरोबर सध्या शेणखत आणि  सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन बेडची चाळणी करुन घेण्याचे काम सुरू आहे. झाडाची वाढ आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊनच खतमात्रेचे नियोजन केले आहे.

माझी आठ एकर डाळिंब लागवड आहे. यातील चार एक भगवा आणि चार एकर सुपर भगवा जातीची लागवड आहे. मला एकरी आठ ते दहा टनाचे उत्पादन मिळते. यंदाच्या वर्षी हवामान बदलाचा मोठा परिणाम डाळिंब उत्पादनावर झाला. नुकताच काढणी हंगाम संपला आहे. यावर्षी मला सर्व क्षेत्रातून २० टन उत्पादन मिळाले असून फळांची विक्री संपली आहे. यंदा कोरोना टाळेबंदीमुळे देखील दराचा फटका बसला.मला सरासरी ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा हा दर किमान १०० रुपये अपेक्षित होता. 

फळ काढणी हंगाम संपल्यानंतर बागेचे पुढील हंगामाचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. सध्या बागेत स्वच्छतेबरोबर सध्या प्रति झाड ३० किलो शेणखत आणि १०० ग्रॅम सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन बेडची चाळणी करुन घेण्याचे काम सुरू आहे. झाडाची वाढ आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊनच खतमात्रेचे नियोजन केले आहे. सध्याच्या काळातील बदलत्या हवामानात डाळिंबावर मावा,पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणाच्यादृष्टीने कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन करणार आहे. हे काम साधारण टप्प्याटप्प्याने तीन महिने चालेल. 

  •  ऑगस्टमध्ये नव्या हंगामाची सुरुवात होईल. त्यादृष्टीने छाटणी, खरड छाटणी आणि पानगळीचे नियोजन करावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये फळधारणा अपेक्षित आहे. फळधारणा सुरु झाल्यावर विद्राव्य खतांबरोबरच फळांच्या फुगवणीसाठी वाढीच्या टप्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देण्याचे नियोजन असते.
  •  सध्या बेडची चाळणी झाल्यानंतर झाडांना लागलेली अनावश्‍यक फुटवे आणि कळ्यांची छाटणी करणार आहे. पुढील काळात वेळेवर पाऊस पडला नाही तर झाडांना भरपूर पाणी देत शिफारशीनुसार कॅल्शियम, बोरॉनची मात्रा देणार आहे. खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक झाडाची तपासणी करत आहे. पावसाच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने देखील वेळेवर फवारणीचे नियोजन असते.  यानंतर तीन महिने झाडांच्या गरजेनुसार विद्राव्य खतांची मात्रा  दिली जाते.
  • ऑगस्टमध्ये साधारण जमिनीच्या पोतानुसार १५ दिवस ते १ महिना पाणी बंद करून, बागांना ताण देणार आहे. ताणानंतर खरड छाटणी करून, पावसाच्या अंदाजानुसार पाणी देण्याचे नियोजन सुरू होते.
  •  दोन महिन्यांनी बाग फुटायला लागल्यावर कळी धारणा होऊन ऑक्टोबर बहर सुरु होईल. यानंतर पीक वाढीच्या टप्यानुसार विद्राव्य खताची मात्रा देण्याचे नियोजन असते. दर्जेदार फळांच्या उत्पादनासाठी काटेकोर बागेचे व्यवस्थापन मी ठेवतो. गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजनात बदल करण्यावर माझा भर असतो. 

- राजू कोंडे, ९२८४०५६०५९

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
मका उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रावर भर  यंदा पंधरा एकर क्षेत्रावर मका लागवडीचे...
`कोरडवाहू` प्रकल्पातून मिळाली शेती,...सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र...
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
बियाणे बदल, संतुलित खत व्यवस्थापनातून...खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या...
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...