आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदल

टाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधील १७ आदिवासी भागांमध्ये 'लखपती किसान` हा उपक्रम राबवत आहे. यामुळे शेती आणि पूरक रोजगारांचे एकत्रीकरण करून सामाजिक पुढाकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला नवी दिशा मिळाली आहे.
farming by women SHG
farming by women SHG

टाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधील १७ आदिवासी भागांमध्ये 'लखपती किसान` हा उपक्रम राबवत आहे. यामुळे शेती आणि पूरक रोजगारांचे एकत्रीकरण करून सामाजिक पुढाकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला नवी दिशा मिळाली आहे.

आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण आणि उपजीविका निर्मितीसाठी  टाटा ट्रस्टच्या `सेंट्रल इंडिया' उपक्रमामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सर्व स्तरापर्यंत प्रयत्न केले जातात.  उपजीविका संधी व साधनांना मजबूत करून आणि त्यांचे स्तर निर्माण करून आदिवासी समुदायांना अन्नधान्य व आर्थिक सुरक्षितता पुरविण्यावर भर दिला जातो. ‘सीआयएनआय' मार्फत आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण व कुटुंबांच्या इतर गरजा पूर्ण करण्यात मदत मिळते. झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधील १७ आदिवासी प्राबल्य असलेल्या भागांमध्ये 'लखपती किसान' हा उपक्रम शेती आणि पूरक रोजगारांचे एकत्रीकरण करून सामाजिक पुढाकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला नवी दिशा देत आहे.  शेती आणि पशुधन, शेती आणि लाकडाव्यतिरिक्त जंगलातून मिळणाऱ्या इतर वस्तू इत्यादी असे रोजगाराचे दोन स्तर निर्माण करून कुटुंबांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता निर्माण केली जाते. याचे दिसून येणारे परिणाम उत्साहवर्धक आहेत. सुमारे ३०,००० कुटुंबांना लखपती बनवण्यात यश मिळाले आहे. विविध गावांमध्ये असे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे हिम्मोत्थान सोसायटी आणि सेंटर फॉर मायक्रोफायनान्स हे लघू भूधारक शेतकऱ्यांना सुधारित पीक पद्धती तसेच पूरक रोजगारांना प्रोत्साहन देत आहेत.

शेती पद्धतीमध्ये झाला बदल धाबडा (जि.दाहोड,गुजरात) गावात राहणाऱ्या सुमित्राबेन यांच्या कुटुंबाला २०१५ पर्यंत वर्षाला सुमारे  ५०,००० ते ६०,००० रुपयांचे उत्पन्न मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते. मात्र लखपती किसान उपक्रमात सहभागी झाल्यापासून गेल्या तीन वर्षात सुमित्राबेन यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षाही जास्त वाढले.  हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुमित्राबेन यांनी पुढाकार घेतला, तसेच स्वतःच्या गावातील महिलांना एकत्र आणून एक स्वयंसहायता गट स्थापन केला.  सुमित्राबेन आणि गावातील महिला सहकाऱ्यांनी स्थापन केलेला हा गट सर्वात सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता गटांपैकी एक आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारची आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या लागवडीचे नियोजन, रोजगाराचे नवे स्तर निर्माण करणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेसोबत जोडले जात आहे. याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे.      या आदिवासी पटयातील शेतकरी खरिपात भात,मका आणि रब्बी हंगामात गव्हाची लागवड करतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेने  बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन टोमॅटो, वांगी,मिरची, कारले,कलिंगड आदी पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक आणि शहरी बाजारपेठेमध्ये विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली. यासाठी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे नियोजन करण्यात आले. शेती व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या नियोजनात झालेल्या आश्वासक बदलामुळे बचत गटातील महिला अभिमानाने सांगतात की, हे माझे शेत आहे, माझी पिके आहेत, माझे उत्पन्न आणि माझा व्यवसाय आहे.  आता आमचा शेतीमाल स्वतः बाजारपेठेत विकतो. आम्ही व्यावसायिक बनलो आहोत.

(लेखक विभागीय व्यवस्थापक (उत्तर आणि मध्य भारत),टाटा ट्रस्ट आणि कार्यकारी संचालक, सीआयएनआय, नाविन्य आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com