Agriculture Agricultural News Marathi success story of Snehgram NGO, Korphle,Dist.Sholapur | Agrowon

स्नेहग्राम बनलंय उपेक्षित मुलांचा आधार

सुदर्शन सुतार
रविवार, 10 मे 2020

समाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी कोरफळे (ता.बार्शी,जि.सोलापूर) येथील महेश निंबाळकर आणि विनया निंबाळकर या पती-पत्नीने पुढाकार घेत वेगळा मार्ग निवडला. या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षकी नोकरी सोडत स्नेहग्राम ही संस्था उभारली. आज विविध शैक्षणिक प्रयोग, उपक्रमांच्या माध्यमातून स्नेहग्रामने राज्यामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.

समाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी कोरफळे (ता.बार्शी,जि.सोलापूर) येथील महेश निंबाळकर आणि विनया निंबाळकर या पती-पत्नीने पुढाकार घेत वेगळा मार्ग निवडला. या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षकी नोकरी सोडत स्नेहग्राम ही संस्था उभारली. आज विविध शैक्षणिक प्रयोग, उपक्रमांच्या माध्यमातून स्नेहग्रामने राज्यामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.

महेश निंबाळकर हे मूळचे बार्शीतील. शिक्षणाची प्रचंड आवड, मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली. यामुळे शिक्षण घेताना अडचणींचा डोंगर उभा राहायचा, पण न डगमगता जिद्दीने महेश यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण आणि क्लासचा खर्च भागवण्यासाठी कधी एसटीडी बुथवर काम, कधी बिगारी तर कधी वीटभट्टीवरचा मजूर म्हणूनही त्यांनी काम केले. आयुष्यातील अशा प्रसंगातून शिकता- शिकता ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. या खडतर प्रवासात बरेच घाव त्यांनी सोसले. त्यातूनच स्नेहग्राम उभे राहिले.

     शिक्षक म्हणून नोकरी करताना बार्शी परिसरात भटक्यांच्या पालांभोवती दिसणारे शाळाबाह्य मुलांचे चित्र त्यांना नेहमी अस्वस्थ करायचे. त्यांच्यात ते स्वतःला पाहायचे. बार्शीमध्ये मराठवाडा, राजस्थान व इतर प्रांतातून आलेल्या डवरी गोसावी, शिकलगार, पारधी, पाथरवट इत्यादी स्थलांतरित, भटक्या जमातीच्या कुटुंबांतील मुले कधी काळी भीक मागायची, काच-कचरा गोळा करायची.

गावच्या माळरानावर पालांमध्ये राहून दररोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या भटक्या कुटुंबांकडे केवळ शिक्षणाचाच अभाव नव्हता, तर भयानक दारिद्र, व्यसन, आरोग्याचे प्रश्न, कुपोषण, अंध:श्रद्धा अशा किती तरी प्रश्नांनी त्यांची मान पकडलेली होती. त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे, या विचाराने त्यांच्यातील अस्वस्थता वाढत गेली आणि मग प्रेरित होऊन महेश यांनी २००७ मध्ये भटक्यांची अनौपचारिक शाळा सुरू केली. त्यातूनच विनया यांच्या रूपाने त्यांना आयुष्याची जोडीदार शिक्षकी पेशातीलच मिळाली. त्यामुळे सूर जुळले, विचार जुळले. मजल-दरमजल करत, संकटाच्या विविध मालिका झेलत बार्शीपासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोरफळ्याच्या माळावर २०१७ मध्ये स्वतःच्या जागेत स्नेहग्राम आकार घेऊ लागले. मात्र, त्यासाठी या दोघांनी मोठी किंमत मोजली. आपल्या नोकरीवर अर्थात, भविष्यावर पाणी सोडले. आज पूर्णवेळ त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले आहे. पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण इथे मुलांना मिळते. महेश आणि विनया हे दोघेच एका व्रतस्थाप्रमाणे ते सर्व मुलांना शिकवतात.     

लोकशाही शाळा संकल्पना  
स्नेहग्राममध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी लाभलेली ४० मुले,मुली आपले भविष्य साकारण्यासाठी धडपडत आहेत. केवळ शिक्षण व संगोपन नव्हे, तर सर्वांगीण विकासावर काम व्हावं, असा प्रयोग इथे राबवला जातोय. त्यातूनच  ‘लोकशाही शाळा‘ हा नवा विचार पुढे आला.   मुलांसाठी असणाऱ्या शाळा मुलांनीच चालवल्या तर..? खऱ्या अर्थानं लोकशाहीचं बीजं मुलांमध्ये रुजतील; याच हेतूने स्नेहग्राममध्ये लोकशाही शाळेचा प्रयोग राबवला. राज्यातील ही पहिला शाळा असावी, जिथं दर महिन्याचे अंदाजपत्रक मुले बनवतात, अन् बालसभेत त्यावर चर्चा करुन सर्वानुमते मंजूरी देतात.

हसत, खेळत अन् उपक्रमशील शिक्षण
शिक्षणाबरोबर बालसभा, निधी कमिटी, कायदा कमिटी, वाचनालय कमिटी, कचरामुक्त-प्लॅस्टिकमुक्त-तंबाखूमुक्त शाळा, शिक्षामुक्त शाळा, स्वत:चा अभ्यासक्रम, परसबाग, सेंद्रिय खतनिर्मिती, स्नेहग्राम विद्यार्थी बचत बँक, कमवा-शिका, फोटोग्राफी, स्नेहग्राम पंचायत, फिनलॅंड अध्यापन पद्धती (४५ मिनिटांचा तास अन् १५ मिनिटांची सुट्टी), क्षेत्रभेटी, ट्री हेल्थ कार्ड, साप वाचवण्याची कला, स्वयंपाक, एक तास वाचनाचा, शिवणकाम, पाणी व्यवस्थापन, पाणवठ्यांचे निर्माण कार्य, स्काईप स्कूल, टँब स्कूल यांतून मुलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न स्नेहग्राम करत आहे. 
  स्नेहग्राममध्ये स्वच्छतेचा पाठ मुले गिरवतात. हॅण्ड वॅाश मुले नियमित वापरतात. निसर्गासोबतच पशू-पक्ष्यांवरही प्रेम करावे, हे विचार येथे आचरणात आल्याचे दिसून येते. येथे मुलांनी हरणांसाठी पाणवठे बनवले आहेत, चिमण्यांसाठी बनवलेल्या घरट्यांत चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडतोय. मुलं मुलांसाठी स्वयंपाक बनवतात, "आम्ही आमच्यासाठी" हा प्रयोग यशस्वी होतोय. शाळेच्या परिसरात सर्वांनी मिळून एक हजार झाडांचे संवर्धन केले आहे.

स्नेहग्राम पंचायत
स्नेहग्रामचा परिसर हे एक गाव समजून या परिसरात शाळेसह सात वॅार्ड निर्माण केले आहेत. शाळेतील मुलं, महेश व विनया या गावातील जनता. कार्यालयीन कामकाजापासून ते अध्यापनातही मुलांना मोकळीकता दिली. गावातील नागरिकांसारखे हक्क व अधिकार दिले आहेत. सरपंच व उपसरपंचासह मुलींनाही ३५ टक्के आरक्षण मुद्दामहून दिले आहे. दर महिन्याला गावाचे सरपंच बालसभेत अंदाजपत्रक सादर करतात, त्यात सर्व मुले चर्चा करतात. सदर अंदाजपत्रक मंजुरीसाठी निधी कमिटीकडे पाठवले जाते, यामुळे शाळेच्या खर्चाचे आकडे मुलांना समजतात.

मुलं बनवतात अंदाजपत्रक
सुरुवातीला एका महिन्याचे स्नेहग्रामचे अंदाजपत्रक मुलांनी बनवायला घेतले, तेव्हा मुलं काहीशी गडबडली. कारण त्यांना पाटी, पेन्सिल व किराणा या शिवाय समोर काही दिसत नव्हते. तेव्हा विनया यांनी मुलांना शाळेच्या दर्शनी भागात लावलेली मासिक खर्चाची पाटी आवर्जून दाखवली. स्वाभाविकच मुलांना खर्चाचा तपशील समोर आला. त्यावर सदस्यांनी चर्चा करुन सुमारे १ लाख ८४ हजारांचे अंदाजपत्रक तयार केले. त्यामुळे मुलांना नकळत महिन्याचा खर्चाचा आकडा पाहून डोळे विस्फारले. जर शाळा मुलांची आहे, तर ती मुलांनीच का चालवू नये...? हा विचार लक्षात घेऊन मुलांना जमा खर्च कळावा, त्यांनी अचूक आकडेमोड करावी, स्नेहग्रामचा खर्च लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीचं मूल्य मुलांना समजावे, हा त्यामागे उद्देश आहे.

स्नेहग्रामला आनंदवनची मदत 
स्नेहग्रामची उभारणी तशी सहजसोपी नव्हती. त्यासाठी महेश आणि विनया यांना मोठी धडपड करावी लागली. या मुलांच्या भविष्यातच ते आपले भविष्य शोधत होते, त्यातूनच `आनंदवन समाजभान अभियाना‘चे प्रमुख कौस्तुभ आमटे यांच्या संपर्कात ते आले. त्यांनीही महेश आणि विनया यांची धडपड पाहून मदत केली. आनंदवन समाजभान अभियानाच्या पाठबळामुळे स्नेहग्रामचा नवा प्रवास सुरु झाला.  अँब्युलन्स, दुचाकी , लॅपटॉप, २ ऑफीस कपाट, धान्य कोठ्या, टेबल, ४ लोखंडी बोर्डस्, पीठ चाळण्या, खुर्ची, ताट-वाट्यापासून जेवणासाठीची भांडी, सतरंजी, ब्लॅंकेट, धान्य असे साहित्यही त्यांना मिळाले. या दरम्यान स्नेहग्राममध्ये सुमारे ४० मुलेही दाखल झाली. महेश आणि विनया यांना डॉ.विकास आमटे, कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांचे चांगले मार्गदर्शन मिळत आहे. 
 

- महेश निंबाळकर, ९८२२८९७३८२

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...