Agriculture Agricultural News Marathi success story of Sunanda Salotkar, Sonegaon,Dist.Nagpur | Page 2 ||| Agrowon

प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली मात

विनोद इंगोले
रविवार, 22 ऑगस्ट 2021

माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी महिलांनी संघर्षाचा बाणा जपत संकटांशी चार हात केले आहेत. यापैकीच एक आहेत सोनेगाव (ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) येथील सुनंदा सालोटकर-जाधव.

माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी महिलांनी संघर्षाचा बाणा जपत संकटांशी चार हात केले आहेत. यापैकीच एक आहेत सोनेगाव (ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) येथील सुनंदा सालोटकर-जाधव. सुनंदाताईंचा संघर्ष आणि शेतीमधील प्रगती अनेकांना दिशादर्शक आहे.

कळमेश्‍वर (जि. नागपूर) तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावरील अडीच हजार लोकवस्तीचे सोनेगाव हे सुनंदा सालोटकर यांचे मुळगाव. कुटुंबाची पावणेसहा एकर शेती. कुटुंबात सुनंदाताईंसह चार बहिणी. सारे काही सुरळीत असतानाच २६ मार्च, १९९६ रोजी सुनंदाताईंच्या वडिलांचा मृतदेह त्यांच्या शेतीमध्ये दिसून आला. त्यांची हत्या झाली असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले. हा मोठा धक्‍का सुनंदाताई आणि कुटुंबीयांसाठी होता. या प्रकरणात त्यांच्या सावत्र आईने सुनंदाताईंच्या आईवर संशय व्यक्त करीत पोलिस तक्रार दिली. हे त्यापेक्षाही दुःखद होते. याप्रकरणात सुनंदाताईंच्या आईला दोन महिने कारागृहात काढावे लागले. या साऱ्या घडामोडी झाल्या, त्या वेळी सुनंदाताईंचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. वडिलांचा मृत्यू आणि आई कारागृहात, अशावेळी स्वतःसह तीनही बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुनंदाताईवर आली. आई कारागृहात असल्याने न्यायालयीन प्रकरणांमुळे ॲड. केशवानंद रोडे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. परिस्थितीचा नेटाने सामना करीत पुढे चालत राहा, असा सल्ला ॲड. रोडे यांनी दिला. याच पाठबळामुळे सुनंदाताईंनी परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. १५ वर्षे संघर्षातच गेली. दरम्यान, त्यांच्या आईला देखील न्यायालयाने निर्दोष सोडले. कायदेशीर सल्ला आणि शेतीच्या नियोजनामध्ये सुनंदाताईंना ॲड. केशवानंद रोडे यांनी चांगले मार्गदर्शन केले.

शेतीने दिली साथ  
शेती व्यवस्थापनाबाबत सुनंदाताई म्हणाल्या, की १९९७ पासून मी शेती नियोजनाला सुरुवात केली. न्यायालयीन खर्चाकरिता पैसा, तीन लहान बहिणींचे शिक्षण आणि कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करायची असेल तर शेती कसल्याशिवाय दुसरा पर्यायही समोर नव्हता. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा व्यावसायिक पद्धतीने शेतीचे नियोजन केले. 

सध्या माझ्याकडे  पावणे सहा एकर लागवड क्षेत्र आहे. सिंचनाकरिता कूपनलिका, विहिरीचा स्रोत आहे. सुरुवातीला कापूस, भाजीपाला लागवड असायची. आता मी बाजारपेठेच्या अभ्यासानुसार  कांदा, लसूण, मिरची, चवळी, वांगी, टोमॅटो या पिकांची लागवड करते. दोन एकरांवर वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन असते. पाणी बचतीसाठी ठिबक आणि तुषार सिंचन केले आहे. सध्या दीड एकरावर कपाशी लागवड आहे.  एक एकरावर सोयाबीन आणि तूर आंतरपीक पद्धती आहे. कपाशीचे सरासरी एकरी १८ क्विंटल आणि सोयाबीनचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते.

बारमाही भाजीपाला लागवडीच्या बरोबरीने एक एकर संत्रा आणि एक एकर मोसंबी लागवड आहे. यामध्ये हळद, आल्याचे आंतरपीक घेतले जाते. दहा गुंठ्यांवर पपई लागवड आहे. फळपिकांचे सेंद्रिय पद्धतीनेच व्यवस्थापन ठेवले जाते. 

सेंद्रिय खत, कीडनाशकांवर भर 
जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला आहे. रासायनिक खतांचा मर्यादित वापर केला जातो.  जास्तीत जास्त शेणखत, कोंबडी खताच्या वापरावर भर आहे. पीक अवशेषदेखील जमिनीमध्ये गाडले जातात. याचबरोबरीने पीक व्यवस्थापनात दशपर्णी अर्क, जिवामृत, सेंद्रिय कीडनाशके, गोमूत्राचा वापर केला जातो. 

थेट भाजीपाला विक्रीवर भर  
गावपरिसरातील बाजारपेठेत दर बुधवार आणि रविवारी भाजीपाला विक्री होते. या दोन दिवसांत खर्च वजा जाता आठ हजारांची उलाढाल होते. ग्राहकांना थेट शेतीमाल विक्री केली जाते. भाजीपाल्याची गुणवत्ता आणि चव चांगली असल्याने ग्राहकांकडून वाढती मागणी असते.

पूरक व्यवसायाची जोड 
सुनंदाताईंनी परसबागेत १५० कोंबड्यांचे संगोपन केले आहे. कोंबडी पिले आणि अंड्यांची विक्री केली जाते. वर्षभरात खर्च वजा जाता सरासरी  सत्तर हजारांचे उत्पन्न मिळते. याचबरोबरीने त्यांनी शेळीपालन केले आहे. सध्या त्यांच्याकडे तीन शेळ्या आहेत. करडांच्या विक्रीतून वर्षभरात २५ हजार रुपये मिळतात. गोठ्यामध्ये एक गीर गाय आहे. गाय प्रति दिन आठ लिटर दूध देते. गावातच दुधाची विक्री केली जाते. 

समविचारी जोडीदार...
सुनंदा सालोटकर यांचा संघर्ष आणि लढवय्या बाण्याची माहिती माध्यमांमधून पसरली. यामुळे प्रेरित झालेल्या चांगुलवाडी (जि. सांगली) येथील तेजपाल जाधव या तरुणाने सुनंदाताईंशी लग्न करण्याची इच्छा दर्शविली. तेजपाल हे कोल्हापूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या कुटुंबाची सात एकर जमीन आहे. लग्न करायचे असेल तर मी माझे गाव आणि बहिणींना सोडणार नाही, असे आधीच सुनंदाताईंनी आपल्या भावी जोडीदाराला सांगितले तसेच माझ्यासोबत सोनेगाव येथेच राहावे लागेल, अशी अट देखील होती. या दोन्ही अटी मान्य करीत तेजपाल जाधव यांनी लग्नास होकार दिला. २०१७ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. या दांपत्याला चतुर्थी नावाची मुलगी आहे. सध्या तेजपाल हे शेती व्यवस्थापनात मदत करून भाजीपाला विक्रीची जबाबदारी देखील सांभाळतात. 

पुरस्कारांनी सन्मान
राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीनिष्ठ, कृषिभूषण आणि कृषिरत्न पुरस्काराने गौरविले आहे. त्यासोबतच विविध सामाजिक संस्थांनी देखील त्यांचा सन्मान केला आहे. 

- सुनंदा सालोटकर,  ९५४५६८१२५७ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...