दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
कृषी प्रक्रिया
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह गुंफले नफ्याचे सूत्र
आम्ही गेल्या महिन्यापासून विविध पदार्थ निर्मिती करण्यात व्यस्त आहोत. केवळ आमच्याच गावातून नाही तर जवळपासच्या तीन चार गावांतून आमच्या पदार्थांना मागणी आहे. गेल्या दीड महिन्यात प्रत्येक महिलेला सुमारे पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत प्राप्ती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विशेष करून स्थानिक भागातून वाढती मागणीमुळे आमचा उत्साह वाढला आहे.
— दिपाली जंगम, पूर्वा स्वयंसहाय्यता समूह,
गडमुडशिंगी, जि.कोल्हापूर.
कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अडचणीमध्ये वाढ झाली, हे खरेच. लॉकडाऊनमुळे विक्री व व्यापारावर अनेक बंधने आली. मात्र, इतक्या बंधनातही गेल्या दीड महिन्यात महिला बचतगटांच्या सुमारे दोनशे महिलांना विविध पदार्थांची निर्मिती व विक्रीतून चांगली उलाढाल साधली आहे. यातून दोनशे महिलांना प्रत्येकी ५ ते १० हजारापर्यंत प्राप्ती झाली आहे.
कणेरीच्या श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे जिल्ह्यातील करवीर, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड, चंदगड या सहा तालुक्यात ३०० बचत गट कार्यरत आहेत. या गटांना लोणची, शेवया, पापड व अन्य खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, गेल्या सहा महिन्यापासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत विक्रीचे नियोजन केले जाई.
या बचतगटातील सुमारे दोनशे महिलांनी कोरोनापासून बचावासाठी योग्य ते उपाय करत उन्हाळी पदार्थांची निर्मिती केली. लॉकडाऊनच्या स्थितीत विक्री कशी होणार, ही समस्या वाटत होती. स्थानिक व्यापाऱ्यासह नवीन ग्राहकांची शोध घेत त्यांनी चांगली विक्री साधली.
लॉकडाऊनचा अनपेक्षित फायदा
लॉकडाऊन व वाहतुकीच्या अडचणीमुळे बाहेरील पदार्थांची आवक होत नव्हती. याचा अनपेक्षित फायदा महिलांना झाला. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या व्यवहारामध्ये स्थानिक पातळीवर ग्राहकांकडून अशा पदार्थांची मागणी वाढत गेली. स्थानिक महिलांकडून तयार होत असलेल्या पदार्थांची लोकप्रियता वाढत गेली. ग्राहकांतील एकमेकांमध्ये झालेल्या प्रसाराचा व प्रसिद्धीचा फायदा झाला. पदार्थांना मागणी वाढत गेली तरी महिलांचा आत्मविश्वास वाढत गेला.
तांदळापासून विविध प्रकारचे पापड आम्ही बनवितो. विविध स्वादाचे पापड स्थानिक बाजारात उपलब्ध केले आहे. त्याच प्रमाणे व्यक्तिगत ग्राहकांकडूनही पापडांची खरेदी चांगल्या होत आहे. सध्या आम्ही दररोज पापड तयार करत असून, ही संधी साधण्याचा प्रयत्न करत आहे.
- सुनिता माळी,
समर्थ महिला बचत गट, मुडशिंगी, जि.कोल्हापूर.
आमच्या केंद्राच्या वतीने सहा तालुक्यातील महिलांचे ३०० बचतगट तयार केले आहे. त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या बचतगटातील सुमारे २०० महिलांनी विविध पदार्थांची निर्मिती करून विक्री करण्यात चांगले यश मिळवले आहे. ही समाधानाची बाब आहे.
- प्रतिभा ठोंबरे, विषय विशेषज्ञ, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र,
कणेरी, जि.कोल्हापूर.
फोटो गॅलरी
- 1 of 15
- ››