पुणे जिल्ह्यात १९ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

पुणे ः स्वस्त धान्य दुकानांच्या विरोधात तक्रारी दाखल होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या धान्य दुकानांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यापैकी एकूण १९ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी चार दुकानांचे परवाने रद्द, तीन परवाने प्रकरणी दंडाची कारवाई, अकरा परवाने निलंबित व धान्याच्या तफावतीची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश आणि एका परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करुन सक्त ताकीद देण्यात आली आहे, असे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नाही. मात्र सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर धान्याचा अपहार व अनियमिततेबाबत अनेक ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तक्रारींच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रत्येक दुकानात प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एफसीआयमधून १३,३७७ टन तांदूळाची उचल करण्यात आलेली आहे. २४ एप्रिलअखेर पाच लाख दहा हजार २८७ कार्डधारकांना बारा हजार १८८ टन धान्य प्रत्यक्षात वाटप केलेले आहे.

अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश नसलेल्या दोन लाख ८८ हजार २९२ केशरी कार्डधारकांच्या १३ लाख ७६ हजार ४९७ लाभार्थी संख्येस एकूण सहा हजार ८८३ टन धान्य १६ एप्रिलला मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ४३४१ टन धान्य उचल करण्यात आले. ५ मेपर्यंत एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com