Agriculture Agricultural News Marathi zillha parishad return fund to government Akola Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी शासनाला समर्पित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत अखर्चित असलेला निधी शासनाला समर्पित करावा, असे निर्देश राज्याच्या वित्त खात्याने दिली होते. यानुसार अकोला जिल्हा परिषदेचा सुमारे ७६ कोटींचा निधी परत पाठविण्यात आला आहे. निधी परत गेल्याने आगामी काळात योजनांच्या अंमलबजावणीवर, खर्चावर मोठी मर्यादा येणार हे निश्‍चित झाले आहे.

अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत अखर्चित असलेला निधी शासनाला समर्पित करावा, असे निर्देश राज्याच्या वित्त खात्याने दिली होते. यानुसार अकोला जिल्हा परिषदेचा सुमारे ७६ कोटींचा निधी परत पाठविण्यात आला आहे. निधी परत गेल्याने आगामी काळात योजनांच्या अंमलबजावणीवर, खर्चावर मोठी मर्यादा येणार हे निश्‍चित झाले आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. यासाठी देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. या निर्बंधांमुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात मोठी घट आली. याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. सध्याच्या काळात राज्याची आर्थिक घडी विस्कळीत होऊ नये म्हणून यावर तत्काळ उपाययोजना म्हणून शासनाने विविध प्रकारच्या खर्चांना कात्री लावली आहे. त्यासोबतच विविध विभाग व कार्यालयांना यापूर्वी वितरित केलेला अखर्चित निधी परत करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.

संबंधित विभागांनी अखर्चित निधी ३१ मे पूर्वी शासनास समर्पित करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शासनाच्या वित्त विभागाने दिला होता. अखेर या आदेशाची जिल्हा परिषदेने अंमलबजावणी करीत अखर्चित निधीचा आढावा घेत संपूर्ण रक्कम परत केली आहे.

विभाग निधी (कोटी,रुपये) : समाजकल्याण ३६.२०, लघुसिंचन ११.१९,शिक्षण १०.६६,
बांधकाम ६.७५,महिला बालकल्याण ५.७२,आरोग्य १.७५,सामान्य प्रशासन १.५७.
पशुसंवर्धन १.०७.पाणीपुरवठा ०.१६,पंचायत ०.१४,कृषी ०.०८.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...