मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी (ता.४) वरिष्ठ विधिज्ज्ञांसमवेत बैठक झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी (ता.४) वरिष्ठ विधिज्ज्ञांसमवेत बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत येत्या मंगळवारी (ता. ७) सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

येत्या मंगळवारी न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही सुनावणीच्या अनुषंगाने या वेळी विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण, सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब  थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा  आरक्षणाची  बाजू मांडणारे वरिष्ठ  विधीज्ज्ञ  मुकूल  रोहतगी, परमजितसिंग टवालिया, विजयसिंह  थोरात, अनिल  साखरे, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधी विभागाचे सहसचिव भुपेंद्र गुरव, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टिकाराम करपते, रसिक खडसे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटी सेलचे डॉ. व्यास आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह वकील अक्षय शिंदे, वैभव सुखदेवे, राहूल चिटणीस, सचिन पाटील आदी सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. उपसमितीच्या २३ जून रोजी झालेल्या बैठकीत सुनावणीपूर्वी वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही बैठक झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com