पिकांचे अवशेष, ऊस पाचटाचे व्यवस्थापन गरजेचे ः डॉ. बी. वेंकटेश्वरलू

नगर : कोरडवाहू शेतीत तीन वर्षांतून एकदा नांगरणी केल्यास जल आणि मृद संवर्धन होण्यास मदत होते. पिकांच्या अवशेषांचे तसेच ऊसाच्या पाचटाचे महत्व संवर्धित शेतीसाठी खूप मोठे आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. याकरिता संवर्धन शेतीमध्ये पिकांच्या अवशेषांचे तसेच उसातील पाचटाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.बी. वेंकटेश्‍वरलूयांनी केले.
माजी कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू
माजी कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू

 नगर  : कोरडवाहू शेतीत तीन वर्षांतून एकदा नांगरणी केल्यास जल आणि मृद संवर्धन होण्यास मदत होते. पिकांच्या अवशेषांचे तसेच ऊसाच्या पाचटाचे महत्व संवर्धित शेतीसाठी खूप मोठे आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. याकरिता संवर्धन शेतीमध्ये पिकांच्या अवशेषांचे तसेच उसातील पाचटाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.बी. वेंकटेश्‍वरलू यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘हवामान अद्यावत शेतीमध्ये संवर्धन शेती आधारित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि पीक पद्धती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रशिक्षणचा समारोप झाला. यावेळी डॉ. वेंकटेश्वरलू यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते.

संवर्धन शेतीची मूलतत्वे हा विषय खूप महत्त्वाचा असून शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर संवर्धन शेती विषयीचा अभ्यासक्रम तयार करून उच्च शिक्षणामध्ये त्याचा समावेश करावा लागेल अशी अपेक्षा कुलगुरु डाॅ. विश्वनाथा यांनी व्यक्त केली. या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये मध्ये जपान, पाकिस्तान, फ्रान्स, नेपाळ, श्रीलंका, इथोपिया आणि अमेरिकेतील ९९० विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com