Agriculture Agricultural News order to give essential facilities to sugarcane cutting workers Sangli Maharashtra | Agrowon

ऊसतोड कामगारांना आवश्यक सेवा द्याव्यात ः जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

सांगली  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमा रोखल्या असून प्रवासी व माल वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच या कामगारांना साखर कारखान्यांनी जीवनावश्‍यक वस्तू आणि आवश्‍यक सेवा द्याव्यात, असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. 

सांगली  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमा रोखल्या असून प्रवासी व माल वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच या कामगारांना साखर कारखान्यांनी जीवनावश्‍यक वस्तू आणि आवश्‍यक सेवा द्याव्यात, असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. 

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा भागातून प्रवासी किंवा माल वाहतूक रोखण्यात आली आहे. अत्यावश्‍यक परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर पोलिसांची लेखी परवानगी आवश्‍यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. 

सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. ‘कोरोना’ च्या भितीने ऊसतोड मजूर गावांकडे परतू लागले आहेत. ऊसतोड मजूर थांबत नसल्यामुळे काहींनी हंगाम आटोपता घेतला आहे. हे ऊसतोड मजूर राज्य तसेच जिल्ह्याबाहेरून आले आहेत. ते घराकडे परतण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांतून जात आहेत. काही ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत.

सध्या जिल्ह्याची सीमा रोखण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाय योजना कराव्यात. याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. ऊसतोड मजुरांच्या निवासाची सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी सोय करावी. तसेच त्यांना जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सेवा पुरवल्या जाव्यात अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी दिल्या आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...