Agriculture Agricultural News order to plan should be prepared to start the school Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी आराखडा तयार करावा : रणजित शिवतरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

पुणे   : शासनाकडून कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास, शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन मे अखेरपर्यंत प्रत्येक शाळेचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

पुणे   : शासनाकडून कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास, शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन मे अखेरपर्यंत प्रत्येक शाळेचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक गुरुवारी (ता.२१) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. वीसपेक्षा कमी पटाच्या व दुर्गम भागातील शाळा सुरू करण्यासाठी उपलब्ध वर्ग खोल्या आणि शिक्षकांची माहिती घेऊन गरजेनुसार पर्यायी खोल्या उपलब्ध होतील का याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. ज्या शाळा सुरू करण्यापूर्वी इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे, हॅण्ड वॉश, दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये पुढील शैक्षणिक वर्षात १५ जूनला शाळा सुरू झाल्या नाही तर अशा शाळांमध्ये डिजीटल माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागेल, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या किती पालकांकडे अ‍ॅड्रॉईड मोबाईल, इंटरनेट कनेक्शन सुविधा, डिश टीव्ही कनेक्शन उपलब्ध आहे याची माहिती गोळा सूचना अधिकाऱ्‍यांना देण्यात आल्या. जिल्ह्यामध्ये वादळी पावसामुळे ज्या शाळांचे नुकसान झाले आहे. अशा शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव अंदाजपत्रकासह मागवण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळांची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे शक्य होणार आहे. या बैठकीत भोरमधील आठ शाळांच्या दुरूस्तींना मंजुरी देण्यात आल्याचे शिवतरे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...