'आण्या'च्या आमटीला सव्वाचार लाखांचा मसाला

आमटी-भाकरी महाप्रसादासाठी जमा झालेल्या बाजरीच्या भाकऱ्यांचा ढीग.
आमटी-भाकरी महाप्रसादासाठी जमा झालेल्या बाजरीच्या भाकऱ्यांचा ढीग.

आळेफाटा, जि. पुणे  : अणे (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता.२७) श्री रंगदासस्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावर्षीच्या आमटीसाठी निव्वळ मसाल्याचा खर्च जवळपास चार ते सव्वाचार लाख रुपये झाला, असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

आणे येथे श्री रंगदासस्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे, श्री रंगदासस्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले. दरवर्षी दानशूर मंडळींच्या वतीने देणगी स्वरूपात, आमटीच्या मसाल्याचा खर्च केला जातो. 

तर परिसरातील ग्रामस्थ बाजरीच्या भाकरी वाजत-गाजत आणून जमा करतात. येत्या २०२९ पर्यंत आमटीसाठी देणगी स्वरुपात मसाला साहित्याचा खर्च करणाऱ्या अन्नदात्यांची यादी जवळपास पूर्ण झालेली आहे. यावर्षी रामदास गंगाधर गुंजाळ व बंधू, स्व. राजाराम आहेर (गुरुजी) यांचे स्मरणार्थ नेताजी व दिलीप आहेर, स्व. योगेश बाबुराव दाते यांच्या स्मरणार्थ रेश्मा कैलास पानसरे (ओतूर), स्व. विठाबाई आहेर यांच्या स्मरणार्थ पांडुरंग भिकाजी आहेर, स्व. द्वारकू बापूजी विश्वासराव यांचे स्मरणार्थ त्यांचे नातू विकास, शरद, अविनाश व शशिकांत विश्वासराव या सर्व दानशूर अन्नदात्यांच्या वतीने आमटी मसाल्याचा संपूर्ण खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अन्नदात्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान शुक्रवारी (ता.२७) व आज (ता.२८) मिळून दोन दिवसात जवळपास ३७ कढया भरून आमटी बनविण्याचे नियोजन होते. आज (ता. २८) काल्याच्या कीर्तनाने या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.   निव्वळ मसाल्याचा खर्च सव्वाचार लाख रुपये आणे येथील आमटी-भाकरी महाप्रसादाच्या आमटीसाठी तूर डाळ ७५० किलो, गुळ, खोबरे व शेंगदाणे प्रत्येकी ३७० किलो, तेल डबे ४०, लवंग व दालचिनी २८ किलो, हळद, जिरे, मोहरी प्रत्येकी २० किलो, कोकम ९० किलो, मीठ २५० किलो आदी सर्व मिळून एकूण ३७ कढया आमटी बनविण्यासाठी निव्वळ मसाल्याचा खर्च जवळपास चार ते सव्वाचार लाख रुपये असेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com