Agriculture Agricultural News Paduka of Saint Shri Dnyaneshwar Maharaj on his way to Pandharpur Maharashtra | Agrowon

संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

आळंदी, जि. पुणे  ः आकर्षक फुलांनी सजविलेली लाल परी...माउली नामाचा गजर..अन् पुंडलिका वरदे हरि विठ्ठलाचा नामघोष करत संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून मंगळवारी (ता. ३०) आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारकऱ्यांसमवेत दुपारी एक वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. 

आळंदी, जि. पुणे  ः आकर्षक फुलांनी सजविलेली लाल परी...माउली नामाचा गजर..अन् पुंडलिका वरदे हरि विठ्ठलाचा नामघोष करत संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून मंगळवारी (ता. ३०) आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारकऱ्यांसमवेत दुपारी एक वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. 

गेली सतरा दिवस संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका आजोळघरात होत्या. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दर्शनाला बंदी होती. आज (ता. १) आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात जाण्यासाठी लगबग होती. अवघ्या वीस लोकांना वारीसाठी परवानगी होती. पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा आणि दुधारती केली. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान नैवद्य दाखविण्यात आला. दुपारी एक वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर हातात माउलींच्या पादुका घेत बसचे दिशेने निघाले. 

या वेळी पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रांताधिकारी संजय तेली, बाळासाहेब चोपदार उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’चा गजर करत माउलींच्या पादुका बसमधे नेल्या आणि बस पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...