`कोरोना`मुळे नगर जिल्हा जनजीवन ठप्प

नगर ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गुरुवारी आदेश काढल्यानंतर सायंकाळपासून जिल्हा ठप्प झाला आहे.
नगर शहर असे बंद आहे
नगर शहर असे बंद आहे

नगर  ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गुरुवारी आदेश काढल्यानंतर सायंकाळपासून जिल्हा ठप्प झाला आहे. पोलिसांनी गावांत फिरुन दुकाने बंद केली. गावे बंद होणार असल्याने व पुन्हा कधी सुरू होतील हे निश्चित नसल्याने लोकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. शुक्रवारी नगरसह जिल्ह्यातील सर्वच गावे कडकडीत बंद असल्याचे पहायला मिळाले.

नगर येथे दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. यात नगर शहराबाहेरील एक जण आहे. त्यामुळे ग्रामीण भागालाही या संसर्गाचा धोका असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले. शिवाय संशयित म्हणून तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झाले आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी आदेश काढल्यानंतर जिल्हा बंद झाला. पोलिस नगर शहरासह कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, अकोले या तालुक्यांमधील गावांसह प्रमुख मोठ्या शहरात ध्वनिक्षेपकांवरून बंदचे आवाहन करत होते. दुकाने, रेस्टॉरंट, बिअरबार, परमीटरुम, मॉल, सुपर मार्केट, कापड दुकाने यांसह मोठी दुकाने बंद करण्यात आली. पोलिस बंद करत असल्याचे पाहताच नागरिकांनीही बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. पुढील आदेश येईपर्यत बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचे आदेश दिले. मात्र त्यात भाजीपाला, फळे, पेट्रोल पंप यांसह जीवनाश्यक वस्तु विक्री करणारी दुकाने वगळलेली होती. मात्र, अन्य मोठी दुकाने बंद होऊ लागल्याने किरकोळ विक्रेतेही दुकानेही बंद करू लागले. लोकांनीही अशा वस्तूच्या खरेदीसाठी गर्दी केली. दोन दिवसांपासून वेगळ्या अफवा सुरूच होत्या.

हे राहणार बंद परमीट रुम, बिअरबार, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस यांसह गर्दी होणारी स्थळे, मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूमधील मॅरेज हॉल, अन्य विवाह स्थळाची ठिकाणे, कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलने, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्चा इतर धार्मिक स्थळे, दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्पलेक्स, मॉल, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, व्यायामशाळा, विविध प्रकारची संग्रहालये, व्हिडिओ पार्लर, ऑनलाइन लॉटरी सेंटर.  

हे सुरू राहणार शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी मंडळाचे उपक्रम, अस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, शहर व जिल्ह्यातील दवाखाने, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अत्यंविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराण सामान, दूध, दुग्ध उत्पादने, फळे, भाजीपाला, औषधालय (मेडिकल), पेट्रोलपंप, जीवनाश्यक वस्तूची विक्री व वितरण दहावी व बारावी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, विद्यापीठ, विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती. प्रसारमाध्यमे (सर्व प्रकारेची दैनिक, नियतकालिके, दूरचित्रवाणी). विद्यार्थ्यांची खानावळी, महाविद्यालय वसतिगृह यांमधील कॅन्टीन, मेस (केवळ परीक्षार्थीसाठी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com