पुण्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना परवाना बंधनकारक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू केले आहे. यामधून जीवनावश्यक वस्तूचे वितरण आणि अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूविषयक सुविधा, त्यांचा पुरवठा, वैद्यकिय सेवा, घरपोच धान्य वितरण आदि सुविधा सुरळीत सुरु राहण्यासाठी त्यांच्या परवानगीकरिता जिल्हा प्रशासनाने सात उपजिल्हाधिकारी आणि दोन तहसीलदारांची नेमणूक केली आहे. अर्जाचे स्वरूप व बाब लक्षात घेऊन तातडीने पासेस किंवा परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम

यामध्ये वीज, पाणी पुरवठा, अग्निशमन यंत्रणा, बँका, धान्य, भाजीपाला, दूध, शेती संबधित उत्पादने, पशुखाद्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, पेट्रोलियम कंपन्या आदिंना जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी देण्यात येणार आहे.  

  परवान्याबाबत यांच्याशी संपर्क साधा
अधिकारी संपर्क परवान्यासाठीचा विषय
अमृत नाटेकर ९४२२६१६०३३ वीज, पाणी, अग्निशमन, बॅंका
सारंग कडोलकर ९४०५५०११०० किराणा माल, भाजीपाला, दूध
निता शिंदे ९४२१११८४४६ शेती संबधित उत्पादने, घरपोच आॅनलाईन सेवा
संजय पवार ९८५००३२०९५ माहिती तंत्रज्ञान
हिम्मत खराडे ९४२२०७२५७२ उद्योग
बालाजी सोमवंशी ९४२१४८५१०० पेट्रोलियम कंपनी
मृणालिनी सावंत ९९२३२०७७६७ अत्यावश्यक वैद्यकिय सेवा, औषधे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com